शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शालेय व उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीवर जोर

By admin | Updated: March 19, 2017 02:32 IST

महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयांची स्थापना, नवीन सैनिकी शाळा सुरू करण्याच्या घोषणेबरोबरच राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात

- विजय बाविस्कर

महाराष्ट्र स्कूल आॅफ ड्रामा, राष्ट्रीय विधी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयांची स्थापना, नवीन सैनिकी शाळा सुरू करण्याच्या घोषणेबरोबरच राज्याच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी केलेली तरतूद समाधानकारक आहे. मात्र, राज्यात नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, अर्थमंत्र्यांच्या भाषणात याचा उल्लेख आला नाही. त्यामुळे नवीन कायदा कसा राबविला जाणार, हा प्रश्न आहे. उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेच्या वाढीसाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) हा केंद्र शासनाचा कार्यक्रम राबविण्यासाठी ४० कोटी निधी प्रस्तावित केला. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभाग हा देशातील सर्वात जुना विभाग असून लवकरच शतकपूर्ती करणार आहे. या विभागाचे नामकरण मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था असे करण्यात येणार असून येत्या पाच वर्षांत विभागाला २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. अर्थविषयक अभ्यासक्रमासाठी ही स्वागतार्ह बाब आहे. कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक व सांगली जिल्ह्यातील पेठ येथे कृषी महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद येथे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू होत आहे. राज्यातील मुंबई, नागपूर व औरंगाबाद या तीन विधी विद्यापीठांच्या विकासासाठी ३९ कोटी २८ लाख रुपये निधी प्रस्तावित केला आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांचे बांधकाम व बळकटीसाठी भरघोस निधीची घोषणा केली आहे. ५५९.३० कोटींची तरतूद यासाठी अर्थमंत्र्यांनी केली आहे. अस्मिता योजना : राज्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील किशोरवयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी अस्मिता योजना सुरू करण्याचा मानस मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.