शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरचा बडा व्यापारी डब्बा ट्रेडिंगचा बादशाह

By admin | Updated: July 7, 2016 02:30 IST

आकोट येथे सुरू असलेल्या डब्बा ट्रेडिंगवर पोलिसांनी छापेमारी करून कोट्यवधी रुपयांच्या या काळय़ा धंद्याचा पर्दाफाश केला आहे.

सचिन राऊत/ अकोला स्टॉक एक्स्चेंजप्रमाणे चालविण्यात येत असलेल्या आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवून सुरू करण्यात आलेल्या समांतर शेअर मार्केटच्या (डब्बा ट्रेडिंग) विदर्भातील अनधिकृत बाजाराचा सर्वेसर्वा मध्य प्रदेशातील एक बडा व्यापारी असून या बड्या व्यापार्‍यानेच विदर्भात डब्बा ट्रेडिंग चालविण्यासाठी ह्यसौदाह्ण साफ्टवेअर उपलब्ध केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. राज्यात डब्बा ट्रेडिंगचा अवैध बाजार फोफावल्याचे पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आल्यानंतर मुंबई, नागपूर आणि त्यानंतर अकोला जिल्हय़ातील आकोट येथे सुरू असलेल्या डब्बा ट्रेडिंगवर पोलिसांनी छापेमारी करून कोट्यवधी रुपयांच्या या काळय़ा धंद्याचा पर्दाफाश केला आहे. आकोटातील नरेश भुतडा आणि त्याचा बंधू दिनेश भुतडा या दोघांनी कस्तुरी कमोडिटीजच्या माध्यमातून डब्बा ट्रेडिंगचा मोठा धंदा सुरू केल्याचे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने छापा घालून ७ जणांना अटक केली. या ठिकाणावरून ह्यसौदाह्ण नावाचे अनधिकृत सॉफ्टवेअर पोलिसांनी जप्त केल्यानंतर त्याची तपासणी केली. यामध्ये ह्यसौदाह्ण सॉफ्टवेअरचे इंदूर कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. विदर्भातील डब्बा ट्रेडिंग इंदूरमधून संचालित होत असल्याचीही माहिती उघड झाली आहे. इंदूरमधील हा बडा व्यापारीच वर्‍हाडातील डब्बा ट्रेडिंगचा बादशाह असल्याचा निष्कर्ष पोलीसांच्या तपास पथकाने काढला आहे. अधिकृत असलेल्या स्टॉक एक्स्चेंजला छेद देणार्‍या या डब्बा ट्रेडिंगचा हा व्यवहार गुंतवणूकदाराच्या डी-मॅट खाते, पॅन क्रमांकाशिवाय चालत असल्याने डब्बा ट्रेडिंगमध्ये सर्वाधिक काळा पैसा गुंतविण्यात येत असल्याची माहिती आता समोर आली आहे. डब्बा ट्रेडिंगमधील गुंतवणूकदार शासनाचा हजारो कोटींचा कर चुकवून हा व्यवहार करीत असल्याचे आकोट आणि नागपूरमध्ये झालेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे.अकोला, अमरावती, नागपूरमधील व्यापारीडब्बा ट्रेडिंग या अनधिकृत शेअर बाजारात अकोला, अमरावती व नागपूरमधील मोठय़ा व्यापार्‍यांनी पैसा गुंतविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अकोला व अमरावती येथील व्यापार्‍यांची आता चौकशी करण्यात येणार आहे. या तीनही ठिकाणच्या मोठय़ा व्यापार्‍यांनी त्यांचा काळा पैसा डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतविला आहे. या मोठय़ा व्यापार्‍यांची साखळी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता असून, त्यानंतर पोलीस छापेमारी करण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. काळा पैसा गुंतविणारे हे व्यापारी लवकरच पोलिसांच्या रडारवर येणार आहेत.ह्यसौदाह्ण इंदूरमधून संचालितडब्बा ट्रेडिंगचा व्यवहार करण्यासाठी तयार करण्यात आलेले सौदा नावाचे सॉफ्टवेअरही अनधिकृत आहे. हे अनधिकृत सॉफ्टवेअर इंदूरमधून संचालित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काळा पैसा गुंतविण्यासाठी डब्बा ट्रेडिंग सर्वांंत सोईस्कर उपाय असून, यासाठी अनधिकृत असलेल्या ह्यसौदाह्ण नावाच्या सॉफ्टवेअरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येत आहे.