शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

उद्योजकतेची ‘भाषा’ आत्मसात करा!

By admin | Updated: August 21, 2016 02:23 IST

‘स्टार्ट अप’ हे उद्योग विश्वातील ‘लेटेस्ट व्हर्जन’ आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी ते सर्वात ‘अर्थपूर्ण’ माध्यम आहे. कारण यात पैशांपेक्षा कल्पकता हेच मुख्य भांडवल असणार आहे

- नितिन पोतदार‘स्टार्ट अप’ हे उद्योग विश्वातील ‘लेटेस्ट व्हर्जन’ आहे. आजच्या टेक्नोसॅव्ही तरुणांसाठी ते सर्वात ‘अर्थपूर्ण’ माध्यम आहे. कारण यात पैशांपेक्षा कल्पकता हेच मुख्य भांडवल असणार आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी शासनाच्या विविध योजना रेड कार्पेट अंथरून तयार आहेत. अनेक परकीय गुंतवणूकदारही आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यासाठी उत्सुक आहेत. या कल्पकतेला प्रोफेशनल अ‍ॅप्रोचची जोड देणे तितकेच गरजेचे आहे. या दिशेने पुढे पाऊल टाकताना त्यांनी सर्वप्रथम उद्योजकता म्हणजे काय? हे समजून घेतले पाहिजे. सोप्या शब्दांत सांगायचे, तर उद्योजकता म्हणजे विविध गोष्टींचा कल्पकतेने, धाडसाने म्हणजे जोखीम पत्करून आणि स्मार्ट वापर करून संपत्तीची निर्मिती करणे. एकदा का हे तंत्र नीट आत्मसात केले की, पुढे कितीही अडचणी आल्या, तरी त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग शोधणे फारसे कठीण जात नाही. मात्र, यात शिकण्याची प्रक्रिया संपली की, त्या उद्योगाचा विकास खुंटतो हे आपण बघतो.‘उद्योजकता’ म्हणजे कोणत्याही उद्योगाचा ‘आत्मा’! उद्योगारूपी शरीरात आत्मा म्हणजे उद्योजकताच नसेल, तर औद्योगिक चैतन्य कसे निर्माण होणार? या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच नावीन्यपूर्ण कल्पना मांडणारे उद्योजक आणि व्यावसायिक यांच्या कामाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने, दरवर्षी २१ आॅगस्ट हा ‘जागतिक उद्योजकता दिवस’ (WED) म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या वतीने  (Alliance of International Business Associations) या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने होणारी व्याख्याने तरुण पिढीला आपल्या कल्पकतेतून आर्थिक उन्नती कशी साधायची आणि आव्हाने स्वीकारून परिस्थिती सुधारण्यासाठी रचनात्मक मार्ग कसा चोखाळायचा, याचे परिणामकारक मार्गदर्शन करतात, तर विविध चर्चासत्रे नैतिक आणि निर्णय करणारे तरुण घडवण्यास मदत करतात. एकूणच उद्योजकता वृत्तीचा योग्य व सकारात्मक पद्धतीने प्रसार-प्रचार व्हावा, यावर त्यात विशेष भर असतो.महाराष्ट्र राज्य भारताची औद्योगिक तर मुंबई ही आर्थिक राजधानी होय आणि म्हणून महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचा आणि पयार्याने इथल्या मराठी माणसांच्या प्रगतीचा विचार करावाच लागेल. गेल्या दोन दशकांतील मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडित वाढत्या एकात्मकतेमुळे महाराष्ट्रासह भारतातील उद्योग क्षेत्रात खूप मोठे बदल झाले आहेत. जागतिकीकरणाच्या परिणामांमुळे नवीन सेवा क्षेत्रांसह सर्वच औद्योगिक क्षेत्रांमधे देशात-परदेशात मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याचबरोबर, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या उगमामुळे भौगोलिक आणि व्यापाराच्या सीमा मोडून पडल्या आहेत.  Today Idea is the capital! त्यामुळे उद्यमशीलता काही निवडक लोकांची मक्तेदारी राहिलेली नसून, ज्यांच्याकडे कल्पकता आहे, अशांना संधी प्राप्त झालेली दिसते. आजच्या तरुणांना इंटरनेटमुळे प्रत्येक क्षेत्राची जगभरातील माहिती उपलब्ध आहे. सेवा क्षेत्रातही स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी आज उपलब्ध झाल्या आहेत. म्हणूनच आजच्या तरुणांचा ‘नोकरी’ करण्यापेक्षा स्वत: काहीतरी निर्माण करण्याकडे कल असतो आणि तो योग्यच आहे, असे मला वाटते. अनेक मोठे उद्योग आणि उद्योगपती स्वत:ला बदलायला तयार नसल्याने व बदलण्यासाठी शिकावे लागते, हे मान्य करायला तयार नसल्याने काळाच्या ओघात मागे पडले. सांगायचा मुद्दा उद्योजकता शिकवता येते का? तर त्याचे उत्तर निश्चितच ‘होय’ असेच द्यावे लागेल. युरोप, अमेरिका, जपान, आॅस्ट्रेलियासारख्या देशांत शालेय वयापासूनच मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजकता शिकवली जाते. तसे वातावरण भारतात प्रामुख्याने औद्योगिक विकासात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात अद्याप दिसत नाही, ते निर्माण करायला पाहिजे.आज शाळाशाळांत विविध विषय शिकवले जातात, पण उद्योजकता अजूनही शालेय पाठ्यपुस्तकात शिकवली जात नाही. खरे तर उद्योजकतेची ‘भाषा’ शाळेपासूनच शिकवली आणि आत्मसात केली गेली पाहिजे. ‘मॅक्सप्लोअर- स्कूल आॅफ बिझनेस’ हा उपक्रम त्याच दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. उद्योजकीय प्रशिक्षणाचा मोठा अनुभव निरीक्षणावर आधारित असतो. इतरांचे प्रयोग, चुकांमधून आणि यश देणाऱ्या कल्पकतेकडे डोळसपणे पाहत, हे शिक्षण आत्मसात करायचे असते. उद्योजकीय कुटुंबात हे प्रशिक्षण बालपणापासूनच रुजत असते, परंतु ज्यांना उद्योजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेली नाही, अशांचे काय? त्यांनी हे प्रशिक्षण जोमाने, चोहोबाजूंनी मिळवत राहिले पाहिजे. आता हेच उदाहरण पाहा. जपानवर अणुबॉम्ब पडल्यानंतर, जपानी राज्यकर्त्यांनी नवा उद्योजकीय जपान निर्माण करताना, तेथील तरुणांना उद्योजकतेचे धडे मिळतील तेथून मिळवून दिले, तर उत्तम उद्योजकीय वातावरण घरी असतानाही कित्येक घराण्यातील तरुण ‘वैश्विक उद्योजकते’चे धडे गिरवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या संस्थेत भरती झालेले होते, हे लक्षात घ्यायला हवे.अर्थात, ज्ञानाधारित उद्योगविश्वात व सेवाक्षेत्रात स्वत:चे स्थान मिळवलेले व मिळवू पाहात असलेले आपल्या समाजातले आजचे तरुण आणि शिक्षणाअभावी मागे पडलेला आपल्याच समाजातील एक वर्ग यांच्यात एक मोठी दरी पाहायला मिळते. ती कमी करण्यासाठी गरज आहे, ती विविध स्तरांत सक्षम आणि फक्त प्रगतीचीच भाषा बोलणाऱ्या महाराष्ट्राची! कळेल ती भाषा, मिळेल ते काम, पडेल ते कष्ट, तेव्हाच होईल जय महाराष्ट्र ..

(लेखक कॉपोर्रेट लॉयर असून मॅक्सेल फाउंडेशनचे संस्थापक आहेत.)