शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जावे ‘इमोजीं’च्या ग्लोबल देशा !

By admin | Updated: July 19, 2016 03:43 IST

फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो.

स्नेहा मोरे,

मुंबई- ‘फिलिंग सॅड’, ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ अशा एक ना अनेक इमोजींच्या भाषेत सध्या सर्वत्र संवाद सुरू असतो. शब्दांपेक्षा या इमोजींच्या माध्यमातून एकमेकांशी बोलणे सोपे होत आहे. १७ जुलै हा दिवस ‘वर्ल्ड इमोजी डे’ म्हणून सेलीब्रेट होतो आहे. याच निमित्ताने या इमोजींच्या विश्वाचा ग्लोबल पसारा दिवसागणिक विस्तारतोय याचीच प्रचिती येते. शब्दांपेक्षा आपण या इमोजींना आपलेसे का केले, यामागचे उत्तर नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे. इमोजींच्या वापराविषयी १ जुलै २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीचा अभ्यास करण्यात आला. नुकत्याच या इमोजींबाबत केलेल्या सर्वेक्षणानुसार, ‘जॉय’ ही इमोजी देशभरात सगळ्यात जास्त शेअर करण्यात आली आहे. ‘टिष्ट्वटर’ने तर खासकरून या दिनानिमित्त हा दिवस ‘फुल्ल’ इमोजी स्पेशल करायचा ठरवला आहे. त्यासाठी खास स्पेशल इमोजी डिझाइन केले असून ‘#वर्ल्ड इमोजी डे’ या हॅशटॅगने शेअर केला जाणार आहे. शिवाय, एक गमतीची गोष्ट म्हणजे ‘कॉफी’च्या इमोजीपेक्षा ‘बिअर’ची इमोजी युजर्सने सगळ्यात जास्त शेअर केली आहे आणि ‘हार्टब्रेक’च्या इमोजीपेक्षा ‘फुलहार्ट’ची इमोजीही टिष्ट्वटरवर हिट ठरली आहे. युनिक इमोजी वापरण्यात भारत काहीसा ‘फ्रंटफूट’वर आहे. युनिक इमोजीमध्ये ‘नमस्ते’, ‘परफेक्ट’ आणि ‘थम्ब्स अप’ यांचे शेअरिंग सर्वाधिक झाले आहे. तर देशाच्या कॅनव्हासवर सगळ्यात जास्त वापर होणाऱ्या टॉप टेन्स इमोजीमध्ये ‘जॉय’, ‘हार्ट आयस्’, ‘नमस्ते’, ‘क्लॅप’, ‘किसिंग हार्ट्स’, ‘परफेक्ट’, ‘ब्लश’, ‘थम्ब्स अप’, ‘डान्सर’ आणि ‘फायर’ यांनी स्थान मिळवले आहे.‘क्रायिंग विथ लाफ्टर’ इमोजी हिट!२०१५ साली खऱ्या अर्थाने इमोजी मेनस्ट्रीममध्ये आल्या. गेल्या वर्षभरात इमोजींचा वापर वाढतो आहे. यातच गेल्या वर्षी टिष्ट्वटरवर ‘क्रायिंग विथ लाफ्टर’ ही इमोजी ६.६ बिलिअन्स युजर्सने वापरली होती. त्यानंतर ‘हार्ट आयस्’चा सर्वाधिक वापर झाला होता.