शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

शहर काँग्रेसची आज तातडीची बैठक

By admin | Updated: July 11, 2017 00:55 IST

नेत्यांच्या स्वहिताने काँग्रेस रसातळाला’ या सोमवारच्या ‘लोकमत’मधील वृत्ताने काँग्रेसच्या वर्तुळात आज खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘नेत्यांच्या स्वहिताने काँग्रेस रसातळाला’ या सोमवारच्या ‘लोकमत’मधील वृत्ताने काँग्रेसच्या वर्तुळात आज खळबळ उडाली. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची मंगळवारी तातडीने बैठक बोलावली आहे. काँग्रेस भवन येथे दुपारी ४ वाजता ही बैठक होईल.काँग्रेसमध्ये माजलेल्या बजबजपुरीबाबत काँग्रेसच्याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सलग तीन मोठ्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला. महापालिकेत २९ नगरसेवकांचे फक्त ९ नगरसेवक झाले, कसला कार्यक्रम नाही, आंदोलन नाही, फक्त पत्रके काढली जातात, अशी खंत या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असते. ‘लोकमत’च्या वृत्तातून याच भावना व्यक्त झाल्या होत्या. त्याची चर्चा सोमवारी दिवसभर राजकीय वर्तुळात होती.पक्षाच्या प्रदेश शाखेकडेही या वृत्ताची कात्रणे काही कार्यकर्त्यांनी पोहोचवली. त्यामुळे प्रदेश शाखेकडूनच तातडीने अशी बैठक घेण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती मिळाली. पक्षाच्या बूथ कमिट्या तसेच ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीचाही कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्याचीही चर्चा याच बैठकीत होणार असल्याचे समजते. पक्षाचे महापालिकेतील सर्व नगरसेवक, शहर संघटनेतील पदाधिकारी तसेच सर्व आघाड्यांचे प्रमुख यांना बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे.