शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

By admin | Updated: May 15, 2016 05:00 IST

लुफ्थान्सा कंपनीच्या विमानाच्या गिअरमध्ये बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर शुक्रवारी रात्री लुफ्थान्सा एलएच-७६४ या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले

मुंबई : लुफ्थान्सा कंपनीच्या विमानाच्या गिअरमध्ये बिघाड झाल्याने छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर शुक्रवारी रात्री लुफ्थान्सा एलएच-७६४ या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील १६३ प्रवासी सुखरूप असून, मुंबई विमानतळावर शेकडो प्रवाशांंंचा खोळंबा झाला. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी बंद करण्यात आली असून, चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली, तर एक विमान हैदराबादकडे वळवण्यात आले.लुफ्थान्साचे एलएच-७६४ क्रमांकाचे विमान म्युनिचमधून मुंबई विमानतळावर उतरणार होते. वेळापत्रकानुसार, शुक्रवारी रात्री ११.२० वाजता हे विमान लँड होणे अपेक्षित होते. मात्र १०.५० वाजण्याच्या सुमारास या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाच्या गिअरमध्ये झालेल्या बिघाडाच्या कारणास्तव वैमानिकाने हे पाऊल उचलले. लँडिंगनंतरही हे विमान मुंबई विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर उभे असल्याने ही धावपट्टी तत्काळ बंद करण्यात आली. येथील उर्वरित सर्व वाहतूक दुसऱ्या धावपट्टीवर वळवण्यात आली. मुख्य धावपट्टीवर उतरलेल्या विमानाचे चारही टायर नादुरुस्त झाले होते. हे विमान बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या काळात मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. याचा फटका उर्वरित विमानांना बसला. त्यात एअर इंडिया, युनायटेड एअरलाइन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स यांचा समावेश होता. या काळात प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती, असे जीव्हीकेकडून स्पष्ट करण्यात आले.