शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीत विमानचे इमर्जन्सी लँडिंग

By admin | Updated: March 10, 2016 01:18 IST

येथील ग्लायडिंग सेंटरमधील एक ग्लायडर (विमान) हवेतील कमी दाबामुळे गोंधळेनगर येथील मोकळ्या जागेत तत्काळ उतरवावे लागले. ६५ वर्षीय ग्लायडर पायलटने दाखविलेल्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

हडपसर : येथील ग्लायडिंग सेंटरमधील एक ग्लायडर (विमान) हवेतील कमी दाबामुळे गोंधळेनगर येथील मोकळ्या जागेत तत्काळ उतरवावे लागले. ६५ वर्षीय ग्लायडर पायलटने दाखविलेल्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत पायलट किरकोळ जखमी झाला आहे. ग्लायडिंग सेंटरशेजारीच गोंधळेनगर येथे मोठी लोकवस्ती आहे. याच भागातील कालव्यालगतच्या मोकळ्या जागेत हे ग्लायडर लँडिंंग करण्यात आले.लक्ष्मण दत्तात्रय कोकाटे ( वय ६५, रा. विमाननगर, पुणे) हे ग्लायडर पायलट डाव्या हाताच्या बोटांना दुखापत झाल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. गाडीतळ येथील ग्लायडिंग सेंटर येथून दुपारी दोनच्या सुमारास ग्लायडर (विमान) घेऊन पायलट कोकाटे यांनी उड्डाण केले होते. अर्धा तास हवेत सराव सुरू होता. सराव सुरू असताना हवेतील कमी दाबामुळे विमानात बिघाड झाल्याचे पायलटच्या लक्षात आले. त्या वेळी सातववाडी या मोठी लोकवस्ती असलेल्या वस्तीवर ग्लायडर होते. त्यामुळे मोठा धोका होता. वेळीच प्रसंगावधान आणि धाडस दाखवून पायलट कोकाटे यांनी येथील पालिकेच्या शहीद करकरे उद्यानाशेजारी कालव्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. तीनच्या सुमारास हे विमान खाली घेत असताना येथील हायटेन्शन वीजतारेला धडकून तार तुटली, तर मोकळ्या जागेत असलेल्या लोखंडी पाईपवर ते आदळले. विमान पडल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली तशी परिसरात बघ्यांनी गर्दी केली. पोलीस आल्यानंतर येथील गर्दीला बाजूला करून विमानाचे भाग सुटे करून विमान हलविण्यात आले. (वार्ताहर)ग्लायडिंग सेंटरचे प्रमुख कॅप्टन चारभे म्हणाले, की हे ग्लायडर हवेवर चालते. हवेत अचानक बदल झाल्यास असे इमर्जन्सी लँडिंग करावे लागते. तसेच, पायलटने योग्य निर्णय घेऊन लोकवस्तीपासून दुरू नेऊन मोकळ्या जागेत लँडिंग केले.