शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आणीबाणी परवडली; पाणीबाणी नको

By admin | Updated: June 9, 2016 03:40 IST

जलसाठ्यांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दिवसरात्र एक करावे लागत आहे.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- जलसाठ्यांनी तळ गाठल्याने पाण्यासाठी दिवसरात्र एक करावे लागत आहे. मात्र, डहाणूत विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासधूस सुरू आहे. कारवाई अपेक्षित असताना ठेकेदारधार्जिन्या प्रशासनाचा त्याला छुपा पाठिंबा असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आणीबाणी परवडली, पाणीबाणी नको, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षीच्या कमी पर्जन्यमानाने हल्ली पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. जून उजाडल्यापासून जलसाठ्यातून पाणी मिळवण्यासाठी डहाणूतील नागरिकांना दिवसरात्र एक करावे लागत आहे. कुटुंबातील लहानापासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना पहाटे लवकर उठून, रात्री उशिरापर्यंत धडपड सुरू असते. पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची वणवण असताना जनावरांचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे. कुटुंबाची दुरवस्था न पाहवून कर्ज काढून कूपनलिका खोदण्याचे काम युद्धापातळीवर सुरू आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत, उपलब्ध पाण्याच्या योग्य नियोजित वापराव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. ही जीवघेणी परिस्थिती असताना विकासाच्या नावाखाली काँक्रिट रस्त्याच्या बांधकामासाठी हजारो लीटर पाण्याची नासाडी करण्याचे काम घोलवड आणि चिखले गावात हाती घेण्यात आले आहे. या बांधकामासाठी सर्रास पाण्याचा अपव्यय सुरू असताना घसा कोरडा असणाऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. मात्र, आर्थिक फायद्यासाठी आसुसलेला ठेकेदार विकासाच्या नावाखाली असुरी मजा लुटत आहे. एकंदरीत प्रशासन पातळीवर हा प्रकार थांबणे आवश्यक असताना डहाणूत डोळेझाक सुरू असल्याने येथील प्रशासन ठेकेदारास अनुकूल असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदार बांधकामासाठी पाण्याचा उपसा कुठून करतो, याचा तपास लावण्यासह तत्काळ बांधकाम थांबवणे अपेक्षित आहे. शिवाय, पाण्याचा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंदविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रस्तेबांधणी अत्यावश्यक आहे. मात्र, मे व जून महिन्यांत पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेता, शासकीय योजनेतून राबवण्यात येणाऱ्या बांधकामांना स्थगिती देण्याची आवश्यकताही वर्तविली जात आहे.