शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

प्रगणनेच्या कामातून शिक्षकांची सुटका

By admin | Updated: September 29, 2016 02:20 IST

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम शिक्षण हक्क कायद्याच्या कलम २७ शी निगडित नसल्याने शिक्षकांना हे काम करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असे म्हणत

मुंबई : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम शिक्षण हक्क कायद्याच्या कलम २७ शी निगडित नसल्याने शिक्षकांना हे काम करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने बुधवारी राज्यातील लाखो शिक्षकांना दिलासा दिला. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी राज्य सरकारने गेल्या वर्षी प्राथमिक शाळांतील काही शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती केली. काम न केल्यास कारवाई करण्याची ताकीदही शिक्षकांना दिली. सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक समिती व अन्य काही शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.‘शिक्षकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करणे, शिक्षक हक्क कायद्याच्या कलम २७ ला अनुसरून नाही. सरकार शिक्षकांना वेगवेगळ्या कामांना जुंपत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, तसेच शिक्षकांचे कामाचे तासही कमी भरले जात आहेत. शिक्षकांना केवळ निवडणूक, जनगणना व आपत्ती निवारणाचे काम दिले जाऊ शकते, त्याशिवाय अन्य कोणतेही काम दिले जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात स्पष्ट केले आहे,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. नरेंद्र बांधिवडेकर यांनी उच्च न्यायालयात केला. सरकारने मद्रास उच्च न्यायालयाने अशाच एका याचिकेत सरकारच्या बाजूने दिलेल्या निर्णयाचा हवाला देत, सरकारचा निर्णय योग्य असल्याचे खंडपीठाला सांगितले. मात्र, खंडपीठाने हा निर्णय या केसमध्ये लागू होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत सरकारचा युक्तिवाद फेटाळला.‘राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्याचे काम शिक्षण हक्क कायद्याला अनुसरून नाही. त्यामुळे हे काम करण्याची सक्ती शिक्षकांवर केली जाऊ शकत नाही,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिका निकाली काढल्या. (प्रतिनिधी)