शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

‘आयसोलेटेड’ विद्यार्थी डी.फार्म.साठी पात्र

By admin | Updated: August 11, 2016 04:38 IST

‘आयसोलेटेड’ विद्यार्थी डी. फार्म. अभ्यासक्रमासाठी पात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.

नागपूर : ‘आयसोलेटेड’ विद्यार्थी डी. फार्म. अभ्यासक्रमासाठी पात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले. तसेच, या विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्याचे निर्देशही तंत्रशिक्षण संचालकांना दिले. न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी हा निर्णय देऊन संबंधित रिट याचिका निकाली काढली.तंत्रशिक्षण संचालकांनी १३ जुलै २०१६ रोजी सर्व संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठवून आयसोलेटेड विद्यार्थ्यांना डी. फार्म. अभ्यासक्रमामध्ये प्रवेश नाकारण्यास सांगितले होते. याविरुद्ध किशोर भारस्करसह पाच आयसोलेटेड विद्यार्थ्यांनी रिट याचिका दाखल केली होती. डी. फार्म. अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी विज्ञान शाखेतून रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अनिवार्य विषयांसह जीवशास्त्र किंवा गणित यापैकी एक विषय घेऊन इयत्ता बारावी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.सुरुवातीला वाणिज्य किंवा कला शाखेतून इयत्ता बारावी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेची पदवी हवी असल्यास रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अनिवार्य विषयांसह जीवशास्त्र किंवा गणित यापैकी एक विषयात आयसोलेटेड परीक्षा देता येते. अशा विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपर्यंत डी. फार्म. अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येत होता. परंतु, यावर्षी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अनिवार्य विषयांसह जीवशास्त्र किंवा गणित यापैकी एक विषयात आयसोलेटेड परीक्षा उत्तीर्ण करणारे वाणिज्य किंवा कला शाखेचे विद्यार्थी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या समकक्ष असल्याचे सांगितले. हे उत्तर लक्षात घेता तंत्रशिक्षण संचालकांनी आयसोलेटेड विद्यार्थ्यांना डी. फार्म. अभ्यासक्रमात प्रवेश देण्याची तयारी दर्शविली. यानंतर न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्णय दिला. (प्रतिनिधी)