शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी यंदा २ लाख ९२ हजार जागा

By admin | Updated: May 18, 2017 03:04 IST

अकरावी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सरळ, सुलभ व्हावी, म्हणून नवीन प्रक्रिया पद्धती लागू करण्यात आली आहे, पण या पद्धतीमुळे यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा

- लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना सरळ, सुलभ व्हावी, म्हणून नवीन प्रक्रिया पद्धती लागू करण्यात आली आहे, पण या पद्धतीमुळे यंदाची अकरावी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीसाठी यंदा २ लाख ९२ हजार जागा असून, यापैकी १ लाख ५९ हजार जागा आॅनलाइन भरण्यात येणार असून, प्रवेश प्रक्रिया २५ मे नंतर सुरू होणार आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीसाठीच्या एकूण १३ हजार ८०८ जागा वाढल्या आहेत. शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रात यंदा अकरावीसाठी एकूण २ लाख ९२ हजार ९० जागा उपब्लध आहेत. त्यात कला शाखेसाठी ३४ हजार १८०, वाणिज्य शाखेसाठी १ लाख ६० हजार ८७०, विज्ञान शाखेसाठी ९१ हजार १० जागा आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ हजारांहून अधिक जागा वाढल्या आहेत. एकूण उपलब्ध जागांपैकी आॅनलाइनसाठी १ लाख ५९ हजार ६८२ जागा उपलब्ध असणार आहेत. यात कला शाखेसाठी १९ हजार ९२४, वाणिज्य शाखेसाठी ८५ हजार १६३, विज्ञान शाखेसाठी ५० हजार ८४९ आणि एमसीव्हीसाठी ३ हजार ७४६ जागा उपलब्ध असतील, असे जाहीर करण्यात आले आहे. यंदा पुरेशा जागागेल्या वर्षी आॅनलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी, पालक त्रस्त झाले होते. ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी, आॅनलाइन पद्धत पूर्णपणे नव्याने राबविण्यात आली आहे. यासाठी एका नवीन कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या जागा बुधवारी जाहीर करण्यात आल्या. या वेळी अकरावीसाठी पुरेशा जागा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यंदा अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असे शिक्षण विभागाचे उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.