शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची विशेष गुणवत्ता यादी उशिरा जाहीर होणार

By admin | Updated: August 11, 2016 17:42 IST

अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणा-या विशेष आॅनलाईन फेरीतील पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 - अकरावी प्रवेशासाठी राबवण्यात येणा-या विशेष आॅनलाईन फेरीतील पहिली गुणवत्ता यादी गुरूवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार होती. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही यादी रात्री ८ वाजल्यानंतर जाहीर होणार आहे.विद्यार्थ्यांना मात्र याची कल्पना नसल्याने सायंकाळी यादी तपासणा-या हजारो विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.पहिल्या आॅनलाईन प्रक्रियेत दूरचे महाविद्यालय मिळाल्याने महाविद्यालय बदल करू इच्छीणा-या विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी मोठ्या संख्येने अर्ज केलेले आहेत. याशिवाय शाखा आणि विषय बदल करू इच्छीणा-या विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी अर्ज केले आहेत. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत या फेरीसाठी एकूण ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष यादीत नाव जाहीर होणा-या विद्यार्थ्यांना शुक्रवार व शनिवारी संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मात्र सायंकाळी उशिराने यादी जाहीर होणार असल्याचे कळताच विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.गुणवत्ता यादी पाहण्यासाठी घरात संगणक नसल्याने सायबर कॅफेमध्ये जावे लागते. मात्र रात्री आठ वाजल्यानंतर यादी जाहीर होणार असल्याचे कळाले.त्यामुळे घरातून रात्री उशिराने बाहेर जावे लागणार आहे. घरापासून सायबर कॅफे दूर असल्याने पालकांना सोबत घेऊन जावे लागेल. शुक्रवारी आणि शनिवारी प्रवेश निश्चित करायचा असल्याने आजच यादी पाहणे जरूरी आहे. किमान विद्यार्थिनींचा विचार प्रशासनाने करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.