शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची दुसरी विशेष फेरी आजपासून

By admin | Updated: August 16, 2016 01:44 IST

अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीमध्ये ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होत आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी

मुंबई : अकरावीच्या पहिल्या विशेष फेरीमध्ये ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या विशेष फेरीला सुरुवात होत आहे. सुमारे ५० हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशबदल करण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.पहिल्या विशेष फेरीसाठी ६७ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील ५९ हजार ९६० विद्यार्थ्यांना निश्चित प्रवेश देण्यात आला, तर ७ हजार ६६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नव्हता. मात्र प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ४४ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी प्रवेशबदल केला, तर १५ हजार २३२ विद्यार्थ्यांनी प्रशासनाने दिलेला पर्याय नाकारला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थी पुन्हा प्रवेश अर्ज करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पहिल्या फेरीत अर्ज करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले, तर २६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. मंगळवारी, १६ आॅगस्टला दुसरी विशेष फेरी सुरू होत असून, पुन्हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यास सुरुवात होईल. पहिल्या फेरीत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना या वेळी नव्याने लॉग इन आयडी व पासवर्ड घ्यावा लागेल. अर्धवट अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना नवा आयडी आणि पासवर्ड घेण्याची गरज नाही. आधी अर्धवट राहिलेला प्रवेश अर्ज नव्याने भरून पसंतीक्रम अर्ज भरावा लागेल. १६ ते १९ आॅगस्टमार्गदर्शन केंद्रांवर नवीन लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करता येईल. (मार्गदर्शन केंद्रांचे पत्ते मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये दिलेले आहेत.)१९ व २० आॅगस्ट (रात्री ११.५८ वाजेपर्यंत) नवीन आॅनलाइन अर्ज आणि पसंतीक्रम अर्ज भरता येईल.२३ आॅगस्टदुसरी विशेष गुणवत्ता यादी सायंकाळी ५ वाजता जाहीर होईल.२४ आणि २५ आॅगस्टदुसऱ्या विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान संबंधित महाविद्यालयांत शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येईल.