शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी आॅनलाइन अर्ज २९ जूनपर्यंत भरता येणार

By admin | Updated: June 28, 2017 02:05 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा गोंधळ संपला असे चित्र असतानाच शेवटच्या दिवशीही हा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले. अनेक विद्यार्थ्यांना गुण दिसत नव्हते तसेच अर्ज भरताना अन्य अडचणी येत होत्या. त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरून न झाल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयातला फोन सतत खणखणत होता. त्यामुळे अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत दोन दिवसांनी वाढवलेली असून २९ जूनला सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनी नि:श्वास सोडला. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज भरणे अनिवार्य आहे. १३ जून रोजी आॅनलाइनवर दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १६ जून रोजी विद्यार्थ्यांनी अर्ज दोन भरण्यास सुरुवात केली. विद्यार्थी दुसरा अर्ज भरत असताना अनेक अडचणी येत होत्या. तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकही त्रस्त झाले होते. त्यामुळे संकेतस्थळातील त्रुटी काढून टाकण्यासाठी नवीन कंपनीला एक दिवस देण्यात आला. या कंपनीने एका दिवसात त्रुटी दुरुस्त केल्याचा दावा केला. शिक्षण उपसंचालक विभागानेही त्रुटी दूर झाल्याचे स्पष्ट केले. परंतु अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सतत विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या म्हणूनच पालकांनी तेथे हजेरी लावली होती. अनेक विद्यार्थ्यांचे वाढीव गुण शेवटच्या दिवशीही संकेतस्थळावर दिसत नव्हते. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची वाढ देण्यात आल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली.