शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

अकरावीची उद्या तिसरी गुणवत्ता यादी, कोट्यातील ७,६४३ जागा आॅनलाईनसाठी खुल्या

By admin | Updated: July 11, 2016 20:30 IST

मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे.

ऑनलाइन लोकमत,

मुंबई, दि. 11-  मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी आॅनलाईन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार आहे. दुसऱ्या यादीअखेर २७ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केला असून अद्यापही १५ हजार ६५२ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, बहुतेक महाविद्यालयांनी अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि इन हाऊस कोट्यातील एकूण ७ हजार ६४३ जागा आॅनलाईनसाठी खुल्या (समर्पित) केल्या आहेत.अकरावी प्रवेशासाठी मुंबई महानगर क्षेत्रातील ७१९ महाविद्यालयांमध्ये २ लाख ६९ हजार १७२ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी यंदा एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. पहिल्या गुणवत्ता यादीत १ लाख ८४ हजार ९७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र त्यांपैकी केवळ १ लाख २१ हजार ८६९ इतक्या विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केले. त्यामुळे ६३ हजार १०८ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर गेले. दुसऱ्या यादीत ५९ हजार ५०७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. मात्र त्यांपैकी महाविद्यालयांत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २७ हजार ९८५ इतकी आहे. परिणामी दुसऱ्या यादीनंतर आणखी ३१ हजार ५२२ विद्यार्थी आॅनलाईन प्रक्रियेबाहेर पडले आहेत. तरी उरलेल्या १५ हजार ६५२ विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीनंतर प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे.सर्वांना प्रवेश मिळणारतिसऱ्या यादीत काही विद्यार्थी प्रवेशाविना राहण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर समुपदेशन फेरीत किंवा चौथ्या यादीत संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित होईल. त्यामुळे अद्याप ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. आॅनलाईनसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, अशी प्रतिक्रिया मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली..........................कोट्यातील ५० हजार जागा खुल्यापहिल्या यादीअखेर महाविद्यालयांनी अल्पसंख्यांक, व्यवस्थापन आणि इन हाऊस कोट्यातील एकूण ४३ हजार ४९९ जागा आॅनलाईनसाठी खुल्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या यादीतील प्रवेशानंतर अल्पसंख्यांकच्या ४ हजार ५५४, इन हाऊसच्या २ हजार ५२५ आणि व्यवस्थापन कोट्यातील ५६४ जागा मिळून एकूण ७ हजार ६४३ जागा आॅनलाईनसाठी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या यादीअखेर कोट्यातील एकूण ५१ हजार १४२ जागा आॅनलाईनच्याविद्यार्थ्यांसाठी खुल्या झाल्या आहेत.