शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशाची ‘आॅफलाइन’ जाहिरातबाजी

By admin | Updated: June 29, 2016 00:53 IST

विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्याबद्दल शिक्षण उपसंचालकांनी एका नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

पुणे : अकरावी प्रवेशाबाबत ‘आॅनलाइनपासून मुक्तता’ अशी विद्यार्थी व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरातबाजी केल्याबद्दल शिक्षण उपसंचालकांनी एका नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. हे महाविद्यालय पुणे महापालिकेच्या हद्दीत नसल्याने आॅनलाइन प्रक्रियेत सहभागी नाही. मात्र या महाविद्यालयाला अकरावी प्रवेशासाठी अद्याप मान्यता दिलेली नसल्याने ही जाहिरात करणे योग्य नसल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. हद्दीबाहेरील प्रवेशासाठी आॅनलाइन प्रक्रिया राबविली जात नाही. संंबंधित महाविद्यालयस्तरावरच प्रवेश दिले जातात. हवेली तालुक्यातील नऱ्हे येथील शार्दुल सुधाकरराव जाधवर वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. या महाविद्यालयाला शिक्षण उपसंचालक कार्यालयाने अद्याप परवानगीपत्र दिलेले नाही. त्यामुळे अकरावी प्रवेश करता येत नाहीत. मात्र महाविद्यालयाने काही दिवसांपूर्वी ‘आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेपासून मुक्तता. अकरावी व बारावीत थेट प्रवेश’ अशी पत्रके शहरातील काही भागांत वाटली होती. या पत्रकांबाबतची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे आली होती. त्यानुसार शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर यांनी २६ जून रोजी महाविद्यालयाला शासनाची व पालकांची दिशाभूल करणारी जाहिरात दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली.अकरावी आॅनलाइन प्रवेशाचे काम सुरू असताना अशी दिशाभूल करणारी जाहिरात करणे तसेच परवानगीपत्र दिलेले नसताना प्रवेशाची जाहिरात करणे योग्य नाही. याबाबत महाराष्ट्र खासगी शाळा अधिनियम १९८१ नुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा समक्ष हजर राहून करावा; अन्यथा कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. >महाविद्यालयाचा माफीनामाशिक्षण उपसंचालकांनी नोटीस बजावल्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याबाबत लेखी खुलासा केला असून झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा करावी, असे त्यात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी ही जाहिरात देण्यात आली होती. या महाविद्यालयाला ग्रामीण भागात परवानगी मिळाल्याने आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया लागू नाही. त्यामुळे पालकांची दिशाभूल करण्याचा कोणताही उद्देश नाही. प्रवेश अद्याप सुरू केलेले नाहीत. परवानगीपत्रानंतरच प्रवेश दिले जातील, असा खुलासा महाविद्यालयातर्फे करण्यात आला आहे.आॅफलाइन प्रवेशाबाबत जाहिरात करण्यात आल्याची तक्रार मिळाली होती. त्यानुसार माहिती घेतली असता अद्याप महाविद्यालयाला परवानगीपत्र दिले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आॅनलाइन प्रक्रिया सुरू असताना आॅफलाइनची जाहिरात करणे योग्य नाही. याबाबत महाविद्यालयाकडून खुलासा देण्यात आला आहे.- मीनाक्षी राऊत सहायक शिक्षण संचालक