शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

इलेक्ट्रॉनिक्स शाखेला मिळेनात विद्यार्थी!

By admin | Updated: June 16, 2017 23:46 IST

बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे

मयूर देवकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 16 - बारावीनंतर करिअर म्हणजे इंजिनिअरिंग असे समीकरण रुढ असलेल्या मराठवाड्यात आता या क्षेत्राबद्दलचे आकर्षण हळूहळू का होईना पण ओसरताना दिसत आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि आयटी या दोन अभियांत्रिकी शाखांना गेल्या वर्षी औरंगाबादसह संपूर्ण मराठवाड्यात थंड प्रतिसाद मिळाला. काही महाविद्यालयांमध्ये तर एकही जागा भरली गेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील पाच ते सहा महाविद्यालयांनी या शाखेतील प्रवेश थांबवावे अशी मागणी तंत्र शिक्षण संचालनालयाकडे केली आहे.औरंगाबाद शहराचा विचार केला असता गेल्या वर्षी येथील दहा महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेच्या ७४२ जागांपैकी केवळ १४१ जागा सामान्य प्रवेश प्रक्रियेच्या चौथ्या टप्प्यापर्यंत (कॅप राउंड ४) भरल्या गेल्या. म्हणजे ६०१ जागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. यामध्ये मॅनेजमेंटच्या जागा गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत. एकेकाळी विद्यार्थी आणि पालकांची आवड असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स शाखेची झळाळी अशी उतरावाी हे बदलत्या काळाचे सूचक आहे.एकूण अभियांत्रिकी क्षेत्रामध्येच मोठे बदल होत आहे. चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त जागा भरल्याच जात नाही. मागच्या चार वर्षांत अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत १८ टक्क्यांची घट झाली आहे. मेकॅनिकल, कॉम्प्युटर, सिव्हील, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकिच्या प्रमुख शाखा म्हणून ओळखल्या जातात. किमान मराठवाड्यात तरी प्रवेश संख्येत घट होण्याचा सर्वात मोठा फटका इलेक्ट्रॉनिक्स शाखेला बसला आहे. शहर व परिसरातील हाय-टेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी आणि साई कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या दोन महाविद्यालयांमध्ये मागच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स शाखेत प्रत्येकी ६० जगांवर कॅप राऊंडद्वारे एकही प्रवेश झाला नाही. जीएसएमच्या एमआयटी कॉलेजमध्ये तर १८० पैकी केवळ १० जागा भरल्या गेल्या. पीईएसमध्ये ५२ तर देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १८० पैकी ८५ जागा रिकाम्या राहिल्या.रोजगार घटला, प्रवेश घटलेअखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेच्या आकडेवारीनुसार केवळ ४० टक्के इंजिनिअर्स नोकरी मिळण्याच्या पात्रता योग्य आहेत. महाराष्ट्रात तर अभियांत्रिकी महाविद्यालयांचा रोजगार दर केवळ ३५ टक्के आहे. म्हणजे ६५ टक्के विद्यार्थ्यांना पदवीनंतर नोकरीसाठी वणवण करावी लागते. नोकऱ्यांची संख्या घटल्याने बेरोजगारी वाढली आणि त्यामुळेच प्रवेशसंख्येत घट झाली. तसेच सध्याचा अभ्यासक्रम झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत कित्येक वर्ष मागे आहे. यामुळे कौशल्यपूर्ण विद्यार्थी घडवण्यात महाविद्यालये अपयशी ठरत आहेत.इलेक्ट्रिकल आणि सिव्हीलला अच्छे दिनविद्यार्थ्यांच्या प्राधान्य क्रमात सर्वात शेवटी राहणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल शाखांकडे आता ओढा वाढू लागला आहे. ऊर्जा क्षेत्रात होणारी मोठी उलथापालथ आणि बांधकाम व निर्मिती क्षेत्राची वाढलेली मागणी यामुळे या क्षेत्रात रोजगाराची संधी मोठ्या प्रमणात उपलब्ध होत आहे. स्पर्धा परीक्षाद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. म्हणजे नोकऱ्या जास्त आणि प्रशिक्षित उमेदवार कमी अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे या क्षेत्रात तेजी दिसून येते.कॅपच्या चौथ्या टप्प्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या प्रवेशांचे विवरण (२०१६-१७)महाविद्यालय प्रवेशरिकाम्या जागाएकूणहायटेक इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी ०६०६०श्री साई कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पडारी गाव ०४८४८श्रीयश कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ३२७३०औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ४३९४३साई इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग ४३२३६इंटरनॅशनल सेंटर आॅफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग ५४०४५पीईएस कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग ८५२६०छत्रपती शाहु कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग १२४८६०जीएसएम मराठवाडा इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी १०१७०१८०देवगिरी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग ९५८५१८०