शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्युल्लता पंडित वर्दे पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 06:02 IST

श्रमजीवी संघटना-महाराष्ट्र आणि विधायक संसद या संस्था संघटनेच्या संस्थापिका व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या विद्युल्लता पंडित यांना ‘साने गुरूजी आरोग्य मंदिर’

वसई/पारोळ : श्रमजीवी संघटना-महाराष्ट्र आणि विधायक संसद या संस्था संघटनेच्या संस्थापिका व श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष असलेल्या विद्युल्लता पंडित यांना ‘साने गुरूजी आरोग्य मंदिर’ या संस्थेकडून ‘सुधाताई व सदानंद वर्दे पुरस्कार’ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री आणि महाराष्ट्र राज्यातील सामाजिक न्यायाच्या चळवळीत जीवनाच्या अखेरपर्यंत समर्पित भावनेने कार्यरत राहिलेले स्व. सदानंद आणि सुधा वर्दे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मानाचा आहे. विद्युल्लता पंडित यांनी पती व श्रमजीवींचे नेते आणि वसई चे माजी आमदार विवेक पंडित यांच्या साथीने ३७ वर्षांपूर्वी या दोन्ही संस्था-संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. याच माध्यमातून ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील हजारो उपेक्षित श्रमजीवी, आदिवासी, शेतमजूर स्थलांतरित वीटभट्टी मजूर, बालमजूर, विकासापासून वंचित असलेल्या श्रमजीवी मजूर महिलांच्या न्याय्य हक्क आणि सन्मानासाठी कार्य केले. पुरस्कार जाहिर झाल्याने श्रमजीवी संघटना-महाराष्ट्र आणि विधायक संसदच्या परिवाराला आनंद झाला असल्याचे संघटक सचिव किसन चौरे यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी लग्नगड्यांना सावकारीच्या व मराठवाड्यातील हजारो मजुरांना जातीय वेठबिगारीच्या जुलमी पाशातून मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत लंडन येथील गुलामी विरोधी आंतरराष्ट्रीय संघटनेने १९९९ साली गुलामी विरोधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. (प्रतिनिधी)