शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भांडुपमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी

By admin | Updated: July 13, 2017 02:07 IST

पन्नालाल उपविभागात महावितरणच्या विशेष वीजचोरी विरोधी पथकाने २८ लाख ७३ हजार ४१४ रुपयांची वीजचोरी पकडली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळातील भांडुप विभागांतर्गत येणाऱ्या पन्नालाल उपविभागात महावितरणच्या विशेष वीजचोरी विरोधी पथकाने २८ लाख ७३ हजार ४१४ रुपयांची वीजचोरी पकडली आहे. महावितरणाच्या अधिकाऱ्यांची वीजचोरीविरोधी पथकामार्फत अत्याधुनिक यंत्राद्वारे दोन संशयित ग्राहकांवर नजर होती. या ग्राहकांच्या मीटर तपासणीत यंत्राद्वारे (रिमोट कंट्रोल) फेरफार करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित ग्राहकांवर दंडासह गुन्हा नोंदवण्यात आला आहे.भांडुप विभागातील सोनापूर येथील खिंडीपाडा परिसरात प्लास्टीक उद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या परिसरात विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या परिसरात महावितरण लक्ष ठेवून असते. या परिसरात पन्नालाल उपविभागातील १५ कर्मचाऱ्यांच्या पथकाने आठ दिवस मीटर तपासणी मोहीम राबवली होती. त्यानंतर या टीमने सुमारे १५ संशयित मीटर ताब्यात घेऊन त्यांची ग्राहकांसमोर तपासणी केली. येथील रहिवासी कमरुद्दिन खान व रोहन पाष्टे यांचे भाडेकरू अली अहमद खान यांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे या तपासणीत निष्पन्न झाले. महावितरणने या वीजचोरी प्रकरणी वीज ग्राहक कमरुद्दिन खान व रोहन पाष्टे आणि त्यांचे भाडेकरू अली अहमद खान या तिघांवर विद्युत अधिनियम, २००३च्या कलम १३५नुसार गुन्हा नोंदवला आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप बोरकर, केशव इंगोले, श्रुतिका वेर्णेकर, स्वाती पाटील, रमेश पारधी, गणेश पवार, ओम्कार गोसावी, विजय गडलिंग, जोगेश कोळी, सोपान ठोके, किरण पाष्टे यांनी महावितरणची वीजचोरी विरोधातील ही मोहीम यशस्वी केली. या दोन्ही मीटरमध्ये आधुनिक स्वरूपातील यंत्र (रिमोट कंट्रोल) बसवून वीजचोरी करण्यात येत होती. कमरुद्दिन खान यांनी केलेल्या वीजचोरीची एकूण रक्कम १७ लाख १२ हजार ३४४ रुपये इतकी आहे. तर अली अहमद खान यांनी केलेल्या वीजचोरीची एकूण रक्कम ११ लाख ६१ हजार ७० रुपये इतकी आहे. यापैकी अली अहमद खान यांनी केलेल्या वीजचोरीची सर्व रक्कम (११ लाख ६१ हजार ७० रु.) करवाईनंतर महावितरणमध्ये भरली आहे.