शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यात वीज पडून चौघांचा मृ्त्यू

By admin | Updated: August 31, 2014 00:00 IST

तेल्हारा तालुक्यातील निंबोरा व पाथर्डी शिवारात वीज अंगावर पडून चौघांचा मृत्यू.

तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील लामकाणी व निंबोरा शिवारात वीज पडून चौघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि. ३0 ऑगस्टच्या दुपारी एक वाजता घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत चार महिला गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर आकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे, तर पाथर्डी येथील बीएसएनएल मोबाईल टॉवरवर वीज पडल्याने दोन संच बंद पडले आहेत. पोलिस व महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी एक वाजता पाथर्डी येथील मनोहर वानखडे यांच्या लामकाणी शिवारातील शेतात काही महिला निंदनासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान अचानक पाऊस आल्याने हे मजूर घरी परतत होते. रस्त्याने असतानाच वीज कोसळली. त्यामध्ये ज्योतीताई अरविंद महल्ले (३0) सुनीता संतोष थारकर (३२), स्वाती गोतमारे (१८) या तिघींचा बळी गेला, तर निर्मला बराटे (३३), सुनीता मनोहर वानखडे (३२), रेणुका मनोहर वानखडे (१८), दुर्गाबाई नंदकिशोर भिसे (३५) या गंभीर जखमी झाल्यात. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिक तातडीने लामकाणी शिवारात पोहचले. जखमींना आकोट शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदश्रींनी दिलेल्या माहितीनुसार वीज अंगावर पडल्यावर सातही महिला जमिनीवर कोसळल्या. यामध्ये तिघी जागीच मरण पावल्या, तर उर्वरित बेशुद्ध पडल्या. जखमीमध्ये मायलेकीचा समावेश आहे. सदर घटनेने पाथर्डी व निंबोरा गावात शोककळा पसरली आहे. निंबोरा येथील मृतक उत्तम सूर्यभान अडकणे हे पोलिस पाटलाचे वडील आहेत. गुरे-ढोरे चारण्यासाठी ते शेतात गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडली. दरम्यान, तेल्हारा तहसीलदार सचिन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण, तेल्हाराचे ठाणेदार शेख अन्वर, आमदार संजय गावंडे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पुढील कार्यवाही केली. तीनही मृतक महिलांना उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच तालुक्यातील निंबोरा येथेही उत्तमराव अडकने (५५) हे गुरे-ढोरे बांधण्यासाठी गोठय़ात जात असताना त्यांच्या आंगावर वीज पडून त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.