शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना वीजदरात सवलत

By admin | Updated: June 30, 2016 04:04 IST

विदर्भ-मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, डी व डी प्लस क्षेत्रातील उद्योगांना वीज दरात सवलत देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली

मुंबई : विदर्भ-मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, डी व डी प्लस क्षेत्रातील उद्योगांना वीज दरात सवलत देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. सवलतीचे दर १ एप्रिल २०१६ पासून लागू होतील.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी उपसमिती गठित केली होती. या उपसमितीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, परिवहन मंत्री दिवाकर रावते, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचा समावेश होता. उर्वरीत महाराष्ट्र राज्याच्या तुलनेत विदर्भ-मराठवाडात औद्योगिक मागासलेपण असल्याने तेथील उद्योगांना वीजदरात सवलत देण्याची शिफारस समितीने केली होती. त्यानुसार सवलतीच्या दरास मंत्री उपसमितीने मान्यता दिली. मात्र, ही शिफारस करताना सध्या आयोगाने मान्यता दिलेल्या वीज दरानुसार अनुज्ञेय असलेली २६ टक्के पर्यंतची सवलत व अन्य सवलती (रात्रीचा वीज वापर) सुरु ठेवल्या. (विशेष प्रतिनिधी)>अशा असतील सवलतीविदर्भातील उद्योगांना ४० पैसे प्रती युनिट व उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना २० पैसे प्रती युनिट सवलत मिळेल. इंधन समायोजन आकार वरील सवलतीपेक्षा कमी झाला तरी देय असलेली सवलत शासनाकडून दिली जाईल.नवीन उद्योगांसाठी प्रोत्साहनपर सवलत विदर्भ, मराठवाड्यातील नवीन उद्योगांकरता ७५ पैसे प्रती युनीट, उत्तर महाराष्ट्र व डी आणि डी प्लस झोनमध्ये येणाऱ्या नवीन उद्योगांना ५० पैसे प्रती युनिट अशी अतिरीक्त सवलत दिली जाईल.या सवलती फक्त महावितरणकडून १०० टक्के वीज घेणाऱ्या औद्योगिक वसाहतीमधील ग्राहकांना असतील.ही सवलत पुढील ३ वर्षाकरता देण्यात येईल. शासनाला यासाठी १०११ कोटींचा बोजा पडणार आहे. सदर भाराची रक्कम ग्राहकांच्या प्रत्यक्ष वीज वापरानुसार कमी किंवा अधिक होण्याची शक्यता आहे व ती राज्य शासनातर्फे महावितरणला अनुदान स्वरुपात देण्यात येईल.