शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून ९ बकऱ्या ठार; ३ जखमी

By admin | Updated: May 11, 2016 19:27 IST

मेहकर तालुक्यातील मौजे उकळी येथे वीज पडून ९ बकऱ्या ठार तर ३ बकऱ्या जखमी झाल्या

ऑनलाइन लोकमतबुलढाणा, दि. 11- मेहकर तालुक्यातील मौजे उकळी येथे वीज पडून ९ बकऱ्या ठार तर ३ बकऱ्या जखमी झाल्या. तर दोन जण जखमी झाल्याची घटना ११ मे रोजी दुपारी दिड वाजताचे सुमारास घडली.रामदास महादु तुरुकमाने यांचे मायखेड शिवारात असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडावर वीज पडली. यामध्ये आंब्याखाली असलेल्या प्रकाश ज्ञानेश्वर शिंदे रा.उकळी यांच्या तब्बल ८ बकऱ्या ठार झाल्या. तर मदन रुस्तुम धांडे रा.उकळी यांची १ बकरी ठार झाली. देविदास उत्तम शिरे यांची एक बकरी जखमी झाली. तसेच अजय अरुण पातळे (१६) तर विठ्ठल केशव औदगे (३०) हे विज पडल्याने जखमी झाले आहेत. यामध्ये जवळपास दिड लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती समजाच शिवसेना उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, कृउबासचे संचालक रमेश बोरे, उकळीचे सरपंच शिवाजी यशवंते, ग्रा.पं.सदस्य पांडुरंग घाटोळ, गजानन पातळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तर प्रभारी तहसिलदार मिरा पागोरे यांचे सुचनेवरुन तलाठी लक्ष्मण सानप, संजाबराव इंगोले, नारायण गारोळे आदींनी घटनेचा पंचनामा केला. दुपारी १ वाजतापासून मेहकर शहरासह ग्रामीण भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. झाडे पडल्याने वाहतूक खोळंबलीउकळी ते सोनाटी दरम्यान दुपारी १ ते २ वाजताचे सुमारास वादळी वारा झाल्याने रस्त्याच्या कडेला असलेली झाडे रस्त्यामध्ये पडली. त्यामुळे जवळपास दोन तास रिसोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.