शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांत वीज निर्मितीत झाली दुपटीने वाढ

By admin | Updated: August 27, 2015 01:38 IST

दिवसेंदिवस महावितरणच्या ग्राहकांची संख्या वाढत असून, विजेचा वापरही वाढत आहे. गत दहा वर्षांमध्ये राज्यातील विजेची मागणी १२ हजार मेगावॅटने वाढली आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाच्या

- विवेक चांदूरकर,  अकोलादिवसेंदिवस महावितरणच्या ग्राहकांची संख्या वाढत असून, विजेचा वापरही वाढत आहे. गत दहा वर्षांमध्ये राज्यातील विजेची मागणी १२ हजार मेगावॅटने वाढली आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने वीज निर्मितीवरही भर देण्यात येत आहे. दहा वर्षांमध्ये महानिर्मिती, केंद्रीय व खासगी ऊर्जानिर्मिती प्रकल्पांद्वारे वीज निर्मितीत दुपटीने वाढ झाली आहे. २००५-०६ मध्ये १२,४९६ मेगावॅट वीज निर्मिती होत होती, आता २३,५२८ मेगावॉट विजेची निर्मिती करण्यात येत आहे. अन्न, वस्त्र, निवारासोबतच आता वीजही मानवाची गरज झाली आहे. राज्यात सध्या २ कोटी ३० लाख वीज ग्राहक आहेत. २०१५ मध्ये मे महिन्यात सर्वात जास्त १७ हजार मेगावॉट विजेची मागणी नोंदविलीगेली. जसजशी विजेची गरज वाढत आहे, तसतशी विजेची निर्मितीही वाढविण्यावरही शासनाच्या वतीने भर देण्यात येत आहे. त्यामुळे गत दहा वर्षांमध्ये राज्यात शासकीय व खासगी अशा ३० विद्युत निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून विजेची निर्मिती वाढविण्यावर भर देण्यात आला. यादरम्यान काही विद्युत निर्मिती केंद्रांची क्षमता वाढविण्यात आली, तर काही नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले.यामध्ये पारस, विंध्याचल, तारापूर, परळी, दाभोळ, सिपत, महालगाव, घाटघर, कोरबा, भुसावळ, खापरखेडा, अदानी पॉवर, इंडिया बुल्स आदी वीज निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. दहा वर्षांपूर्वी राज्यात १२ हजार ४९६ मेगावॉट विजेची निर्मिती होत होती. आता यामध्ये दुपटीने वाढ होऊन २३ हजार ५२८ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. दाभोळ येथील वीज निर्मिती मे २०१४ पासून बंद असल्यामुळे १९६७.०८ मे. वॉ. वीज उपलब्ध होत नाही.