शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये वीजबिल वाटपात गोंधळ

By admin | Updated: April 30, 2016 01:01 IST

अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही परिस्थिती शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आहे.

सासवड : शहरासह पुरंदर तालुक्याच्या अनेक गावांत वीजबिल वाटपात गोंधळ असून, अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही परिस्थिती शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही आहे. काही शेतकऱ्यांच्या घरी नव्याने बसविण्यात आलेले आधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर हे जास्त गतीने पळत असल्याने एका बल्बचे बिल महिन्याला तब्बल ३ ते ५ हजारांपर्यंत आल्याची उदाहरणे आहेत. याबाबत संबंधित अधिकऱ्यांना सांगितले असता मीटर बदलून देतो, असे सांगितले जाते. परंतु, त्यानंतरही भरमसाट वीजबिल आले तरीही मीटर बदलला जात नाही. अवाजवी वीजबिलामुळे सध्या दुष्काळात होरपळलेला शेतकरी आणखी अडचणीत येत आहे.इमारतीमधील किंवा घराबाहेरील मीटरचा फोटो काढून त्यावर असलेल्या युनिटप्रमाणे बिल तयार केले जाते व ते ग्राहकापर्यंत पोहोचविले जाते, अशी पद्धत होती. परंतु, सध्या बहुतेक ठिकाणी वीजबिलावर मीटरचा फोटो नसतो. त्यामुळे वीजबिल अंदाजे तयार केले जाते. वीजबिल भरण्याची तारीख व बिल ग्राहकाला मिळाल्याची तारीख यांमध्ये किमान ८ दिवसांचे अंतर असल्यास ग्राहक वेळेवर बिल भरू शकतो. परंतु, बिल भरण्याच्या तारखेआधी एक-दोन दिवस किंवा बिल भरण्याच्या तारखेलाच बिल दिले जाते. त्यामुळे ग्राहकांना विनाकारण दंड भरावा लागतो. तसेच उशिरा बिल भरल्यामुळे पुढील महिन्याच्या बिलामध्ये मागील बिल वाढवून येते व हे बिल कमी करण्यासाठी विद्युत मंडळाच्या कार्यलयात जावे लागते.यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. सासवड शहर विस्तारित होत असल्याने अनेक ठिकाणी वीजबिले मिळताच नाहीत; त्यामुळे नागरिकांना स्वत: विद्युत मंडळाच्या कार्यलयात जाऊन वीजबिल घ्यावे लागते.