मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी टंचाईग्रस्त गावांना वीजबिलात साडेतेहतीस टक्के सवलत देण्याची घोषणा केली. त्याचवेळी 11वी-13वीच्या विद्याथ्र्यानादेखील फीमधून माफीची घोषणाही त्यांनी आज केली.
‘लोकमत’शी बोलताना खडसे म्हणाले, आपण मराठवाडा, विदर्भ, खान्देशाचा दौरा केला आहे. केंद्र शासनाच्या देखील संपर्कात आपण आहोत. दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, मात्र सरकारने पंचनामे करण्यातून सवलत मिळवली आहे. 1क्वीर्पयतच्या विद्याथ्र्याना फी माफी आहेच, मात्र टंचाईग्रस्त भागातील 12वीर्पयत शिकणा:या विद्याथ्र्यांची परीक्षा फी माफ केली जाणार आहे. या भागात नरेगा आणि मरेगाचे सूत्र बदलणार असून, 49 टक्के मशीनच्या साहाय्याने आणि 51 टक्के मजुरांच्या माध्यमातून कामे करण्याचे सूत्र अवलंबले जाईल. त्यासाठीची मदत थेट तहसीलदारांना दिली जाईल व त्यांनी ही मदत चेकच्या साहाय्याने द्यावी असे सांगण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. ग्रामपंचायतींना कोणती कामे या माध्यमातून हाती घ्यायची याचे अधिकार दिले आहेत. असे सांगून ते म्हणाले, बीडीओ आणि तहसीलदार यांना यासाठी जबाबदार धरले जाईल. अनेक गावात चाराटंचाई आहे. शिवाय भविष्यात चाराटंचाई होऊ नये म्हणून जे शेतकरी चारा लावतील त्यांचा चारा विकत घेण्याची जबाबदारी सरकारची असेल. शिवाय चारा लावण्यासाठी त्यांना बी-बियाणो दिली जातील. यासाठी चा:याची व पाण्याची टंचाई असणा:या भागात वैरण विकास कार्यक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. फळ बागांसाठी हेक्टरी 35क्क्क्ची मदत दिली जाणार असून मदत 2 हेक्टर्पयत मर्यादित असेल. अल्पभूधारकांना ही मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)
शेतक:यांना कजर्माफी द्या - ठाकरे
महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने थातूरमातूर उपाययोजना करून शेतक:यांची थट्टा करण्याऐवजी कर्जमाफीसह भरीव मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास येत्या
1 डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला. मंगळवारी प्रदेश काँग्रेस कार्यालय गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार उपस्थित होते.