शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

By admin | Updated: June 9, 2017 20:55 IST

देगलूर शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी सायंकाळी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कदेगलूर (जि. नांदेड) : देगलूर शहरासह ग्रामीण भागात शुक्रवारी सायंकाळी जोराचे वारे व विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, रमतापूर (ता. देगलूर) शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून घराकडे परतणाऱ्या दोन चुलतभावांवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोपाळ पंढरीनाथ पाटील (वय ३०) व ज्ञानेश्वर शंकरराव पाटील (वय १५, दोघेही रा. रमतापूर) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन भावांची नावे आहेत. हे दोघे मशागतीची कामे पूर्ण करून घराकडे परतत होते. पैकी ज्ञानेश्वर हा शालेय शिक्षण घेत आहे. रमतापूरचे सरपंच नारायण पाटील, पोलिस पाटील ज्ञानोबा कोळनुरे यांनी ही माहिती दिली. शिवारातील काही लोकांनी दोघांनाही हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले़ परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. ओमप्रकाश कदम यांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. नायब तहसीलदार रघुनाथसिंह चव्हाण यांनी रमतापूर येथील घटनेव्यतिरिक्त अन्य कोठेही वीज पडून प्राणहानी झाली नसल्याचे सांगितले. दरम्यान, देगलूर शहर व परिसरात सुमारे अर्धातास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. नांदेड शहर व जिल्ह्याच्या इतर भागात शुक्रवारी पाऊस झाला नाही. हिमायतनगरमध्ये दमदार पाऊसहिमायतनगर शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली. सिबदरा, वडगाव, कार्ला, पिंछोडी, मंगळुरु, वारंग टाकळी, धानोरा, बोरगडी, बोरगडीतांडा, कौठातांडा आदी भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.