पुणे : प्रदूषण ही देशाची एक मोठी समस्या झाली आहे. ते कमी करण्यासाठी पुढील वर्षभरात पर्यावरणपूरक इलेक्ट्रीक बस, कार आणि दुचाकी बाजारात आणल्या जातील, अशी घोषणा केंद्रीय भृपूष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी पुण्यात केली. त्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) तंत्रज्ञानाची निर्मिती करणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग, व्यवसाय क्षेत्रातील ५८ नामवंतांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या ह्यलोकमत आयकॉन्स आॅफ पीसीएमसीह्ण या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अनिल शिरोळे, ह्यलोकमतह्ण पुणे आवृत्तीचे संपादक विजय बाविस्कर व अन्य मान्यवर व्यासपीठावर होते. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने वाहतूक मंत्रालय आणि इस्रो यांच्यामध्ये करार करण्यात आला. असून त्याअंतर्गत इस्रो ‘कॉस्ट इफेक्टिव्ह बॅटरी टेक्नॉलॉजी’ निर्माण करणार आहे; जी इलेक्ट्रीक बसमध्ये वापरण्यात येईल आणि पर्यावरणपूरक असेल. नियोजित वेळेत बॅटरींचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात येईल आणि वर्षभरात या गाडया रस्त्यावर धावतील, असे गडकरी म्हणाले.नागपूर आणि मुंबई यांना जोडणारा एक्स्प्रेस-वे बनविण्याचे काम सुरू असून तो पुण्यालाही जोडला जाईल, अशी माहिती देऊन ते म्हणाले, पुणे-नाशिक रस्ता निर्माण होण्यात भूमिअधिग्रहणाचे अडथळे येत होते. संबधितांना समजावून हा प्रश्न सोडविण्यात आल्याने आता भूमिअधिग्रहण वेगाने होऊ लागले असून लवकरच हा रस्ता तयार होईल.१,२०० ठिकाणी प्रवासी सुविधाराष्ट्रीय महामार्गांवरील अपघात होण्यामागे रस्त्याच्या कडेला वाहने थांबण्यासाठी जागा नसणे हे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे १ हजार २०० अॅमिनेटिज रोड साईट निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी जागांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत रस्त्यांच्या कडेला ५० एकर, ३५ आणि २५ एकर जागांवर अॅमिनेटिज उभारण्यात येणार आहेत, यामध्ये अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयांमध्ये नेण्यासाठी हेलिपॅड, छोटी रुग्णालये, ट्रक टर्मिनल असेल.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशीलखासदार विजय दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणात, पुण्याच्या विविध प्रश्नांबरोबरच रस्त्यावरील अपघातांमुळे जाणाऱ्या बळींची भीषणता सांगून याबाबत उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली. हाच धागा पकडून गडकरी म्हणाले, राज्यात मंत्री असताना अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मी अपघात निवारण समितीची स्थापना केली होती. या समितीने राज्यातील अपघाताच्या क्षेत्रांचा अभ्यास केला आणि २ हजार अपघातप्रवण क्षेत्रे शोधून काढली. या भागांमध्ये विविध उपाययोजना करून अपघात कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले.
प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभरात इलेक्ट्रिक वाहने
By admin | Updated: August 23, 2015 00:09 IST