शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

कल्याण-डोंबिवलीची निवडणूक १ नोव्हेंबरला

By admin | Updated: September 29, 2015 03:25 IST

कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेसह ३ नवनिर्मित नगर परिषदा व ६४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे

मुंबई : कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महानगरपालिकेसह ३ नवनिर्मित नगर परिषदा व ६४ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे; तर दुसऱ्याच दिवशी २ नोव्हेंबर रोजी मतमोजणी घेऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. याखेरीज गडचिरोली जिल्ह्यातील ४ नगरपंचायतींसाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे; तर २ हजार ३५२ ग्रामपंचायतींकरिता तीन टप्प्यांत मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १२२ जागांकरिता निवडणूक होत असून, त्यापैकी ६१ जागा महिलांकरिता राखीव आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या ८१ जागांकरिता निवडणूक होत असून, त्यापैकी ४१ जागा महिलांकरिता राखीव आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत अगोदर समाविष्ट केलेली व नंतर वगळण्याबाबत प्राथमिक सूचना काढलेल्या २७ गावांमधील जागांकरिता मतदान होईल. त्यानंतर सरकारने या गावांकरिता नगरपालिका स्थापन करण्याचा अंतिम निर्णय घेतला तर नगरपालिकेची निवडणूक घेतली जाईल, असेही सहारिया यांनी सांगितले. सरकारने गावे वगळण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आयोगाला विश्वासात घेतले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका व नगरपालिकेच्या निवडणुकीकरिता १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या कालावधीत मतदान होणार असून आरक्षित जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातप्रमाणपत्र नसल्यास जातपडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागेल. अशा उमेदवारांना निवडून आल्याचे घोषित झाल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली जाईल. या निवडणुकीकरिता मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली. या निवडणुकीत उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवारी अर्ज भरायचे असून त्याची प्रत काढून ती निवडणूक अधिकाऱ्याला सादर करायची आहे. (विशेष प्रतिनिधी)नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमनामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे- १ ते ८ आॅक्टोबर २०१५नामनिर्देशनपत्रांची छाननी: ९ आॅक्टोबर २०१५नामनिर्देशनपत्र मागे घेणे: १९ आॅक्टोबर २०१५मतदान केंद्र व मतदार यादीची प्रसिद्धी: २६ आॅक्टोबर २०१५मतदानाचा दिनांक: १ नोव्हेंबर २०१५मतमोजणी: २ नोव्हेंबर २०१५...............................................................१ नोव्हेंबर रोजी निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा व नगरपंचायतीठाणे- मुरबाड, शहापूर, रत्नागिरी- मंडणगड, सिंधुदुर्ग- दोडामार्ग, वाभावे-वैभववाडी, पुणे- चाकण नगरपरिषद, धुळे- साक्री, अहमदनगर- अकोले, कर्जत, पारनेर, नाशिक- निफाड, पेठ, चांदवड नगरपरिषद, देवळा, कळवण, सुरगणा, औरंगाबाद- सोयगाव, लातूर- जळकोट, चाकूर, देवणी, शिरुर-अनंतपाळ, परभणी- पालम, बीड- शिरुर, वडवणी, पाटोदा, आष्टी, जालना- बदनापूर, घनसांगवी, जाफ्राबाद, मंठा, बुलढाणा- संग्रामपूर, मोताळा, यवतमाळ- महागाव, कळंब, झरी, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, अमरावती- भातकुली, धारणी, नांदगाव-खांडेश्वर, तिवसा, गोंदिया- सालेकरा, सडकअर्जुनी, अर्जुनी, गोरेगाव, देवरी, भंडारा- मोहाडी, साकोला, लाखणी, लाखांदूर, वर्धा- कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर, नागपूर- हिंगणा, कुही, भिवापूर, चंद्रपूर- चिमूर नगरपरिषद, पोंभूर्णा, सावली, गडचिरोली- मुलचेरा, भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी.(सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागांकरिता निवडणूक. चाकण नगरपरिषदेच्या एकूण २३ जागांकरिता निवडणूक. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, धानोरा, कुरखेडा व आरमोली या चार नगरपंचायतींसाठी ६ नोव्हेंबर रोजी मतदान व ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी. याखेरीज १२ नगरपरिषदांच्या १७ जागांच्या रिक्त पदासाठी १ नोव्हेंबर रोजीच पोटनिवडणूक).................................................................ग्रामपंचायत निवडणूकपहिला टप्पा- रायगड (४८), रत्नागिरी (१०), पुणे (४७), नंदुरबार (२३), अहमदनगर (११), बीड (२३), अकोला (१५) व चंद्रपूर (१२)या ८ जिल्ह्यातील एकूण १८९ ग्रामपंचायतींकरिता २८ आॅक्टोबर २०१५ रोजी मतदान व २९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी.दुसरा टप्पा- ठाणे (११३), नाशिक (४४), जळगाव (४), सातारा (१७१), सोलापूर (५२८), सांगली (५४), कोल्हापूर (६), औरंगाबाद (२३), नांदेड (६११), परभणी (३८), उस्मानाबाद (७), जालना (४८२), लातूर (६), हिंगोली (३०), अमरावती (५), यवतमाळ (३), बुलढाणा (६), वाशिम (२), वर्धा (५), गोंदिया (१) व गडचिरोली (सिरोंचा, अहेरी, भामरागड, ऐटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी तालुक्यातील १५) अशा एकूण २ हजार १५४ ग्रामपंचायतींकरिता १ नोव्हेंबर २०१५ रोजी मतदान व ३ नोव्हेंबर २०१५ रोजी मतमोजणी.तिसरा टप्पा- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, कुरखेडा व कोरची तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींकरिता ६ नोव्हेंबर रोजी मतदान व ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी.