शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचा फड दशक्रिया घाटावरही!

By admin | Updated: January 9, 2017 02:11 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्यास अजून कालावधी असताना खेड तालुक्यात मात्र निवडणुकांचे वातावरण ऐन थंडीच्या दिवसांत

आंबेठाण : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्यास अजून कालावधी असताना खेड तालुक्यात मात्र निवडणुकांचे वातावरण ऐन थंडीच्या दिवसांत भलतेच तापले आहे. या निमित्ताने निवडणुकीच्या चर्चा आता तर गावच्या चावडीबरोबरच दशक्रिया विधीच्या घाटावरदेखील चांगल्याच रंगू लागल्या आहे. जिल्ह्यासह राज्यात केव्हाही जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक एकाच वेळी होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच गरम झाले आहे. राजकीय क्षेत्रातील घडामोडींमुळे जिल्ह्यासह राज्यात कायम चर्चेत असणारा खेड तालुका यात आताही काही मागे नाही. तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट आहेत, तर पंचायत समितीचे १४ गण आहेत. तालुक्यात आजपर्यंत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांत लढत होत होती. या पक्षाबरोबर भाजपानेदेखील चांगलेच बाळसे धरले आहे. आळंदी नगर परिषदेत सत्ता आल्याने तालुक्यात सध्या भाजपाचे वारे जोरदार वाहत आहे. काँग्रेसनेदेखील सर्व जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. देशात आणि राज्यात सध्या भाजपा आणि शिवसेनेचे सरकार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांना कशी लढत देतात याचीच तालुक्यात सध्या चर्चा आहे. त्यामुळे तालुक्यात जवळपास चौरंगी ते पंचरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या पक्षातून संधी मिळेल असा अनेकांचा कयास आहे. आणि या सर्वांमधून संधी नाही मिळाली तर या सर्वांच्या लढतीत आपण अपक्ष म्हणून सरळ निघून जाऊ असा अनेकांचा अंदाज आहे.गावच्या चावडीवर चालणारे राजकारण दशक्रिया विधी आणि मयताच्या स्मशानभूमीत नेऊन ठेवले आहे. अशा दु:खद प्रसंगी अनेकजण माझ्या या पाहुण्याला मदत करा, हा माझा जावई आहे. तो भाचा आहे, तो व्याही आहे असे सांगत प्रचार सुरु केला आहे. लक्ष असू द्या असे सांगत आहेत. (वार्ताहर)मतदारांच्या पाया पडणे सुरू : ओळखीचे नसले तरी लगट..१ सध्या लग्नसराईचे दिवस कमी आहेत. त्यामुळे गर्दी जमण्याचे आयते ठिकाण म्हणून अनेकजण मयत आणि दशक्रिया विधीच्या ठिकाणी जाऊन सरळसरळ प्रचार करीत सुटले आहे. भर दशक्रिया विधीच्या घाटावर काहीजण तर महाराज मंडळी सोडून मतदारांच्या पाया पडत सुटले आहे. नात्यागोत्याच्या या स्थानिक राजकारणात अनेकांनी पद एका पक्षाचे आणि प्रचार दुसऱ्या पक्षाचा असा सपाटा सुरू केला आहे. आजवर विश्वास ठेवून ज्या नेत्यांनी पदांची खिरापत वाटली, तेच कार्यकर्ते आता तर पक्ष निष्ठा बाजूला ठेवून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नेत्यांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.२ अनेकांनी प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्यापूर्वी प्रचार सुरु केला असून, त्यासाठी पाहुण्यांची यादीच तयार केली आहे. तालुक्यात काही उमेदवार असे आहेत की रस्त्याने जाताना येताना कोणीही भेटला काय पाहुणे काय चाललंय? बरे आहात ना पाहुणे? असे विचारपूस करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आहे. भलेही ते ओळखीचे नसले तरी चालेल; पण उगाचच त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.