शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

निवडणुकीची कामे करावीच लागणार : हायकोर्ट

By admin | Updated: February 16, 2017 21:08 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशानुसार कामे करावी लागणार आहेत.

ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 16 -  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी कोणत्याही प्रकारचा अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यामुळे निवडणुकीच्या कामांना विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत त्यांना निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशानुसार कामे करावी लागणार आहे. शिक्षकांना निवडणुकीची कामे देण्यात येऊ नये अशा विनंतीसह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आमदार नागो गाणार यांनी रिट याचिका दाखल केली आहे. तसेच, सोमलवाडा येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट, रिसर्च अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट येथे कार्यरत सहायक प्राध्यापक संतोष गेडाम यांची याच विषयावर दुसरी याचिका आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी गुरुवारी दोन्ही याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. तसेच, प्रकरणावर २४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित करून यादरम्यान निवडणूक आयोगासह अन्य प्रतिवादींना उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकांचा निवडणुकीसह अन्य कोणत्याही कामासाठी उपयोग करणे अनुचित आहे. त्यांना केवळ शिक्षणाचेच काम करू दिले पाहिजे असे परिषदेचे म्हणणे आहे. गेडाम यांना ३१ जानेवारी रोजी पत्र पाठवून निवडणुकीच्या कामासाठी बोलावले आहे. त्यावर गेडाम यांचा आक्षेप आहे. विना अनुदानित संस्थेत कार्यरत असल्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या कामामध्ये गुंतविता येणार नाही. कायद्यात यासंदर्भात तरतूद नाही असा दावा त्यांनी केला आहे. परिषदेतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे, गेडाम यांच्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास तर, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.