शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
2
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
3
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
4
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
5
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
6
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
7
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
8
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
9
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
10
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
11
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
12
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
13
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
14
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
15
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
16
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
17
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
18
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
19
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
20
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर

By admin | Updated: June 16, 2014 22:48 IST

राजपत्रात उपाध्यक्षपदाचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी उलथापालथ होत असून

बुलडाणा : राज्यातील नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकींना ७ जून रोजी राज्य मंत्रीमंडळाने स्थगिती दिली होती. मंत्रीमंडळाने प्रसिद्ध केलेल्या या राजपत्रात उपाध्यक्ष पदाचा उल्लेख नसल्यामुळे उपाध्यक्षांना मुदतवाढ मिळाली की नाही याबाबत राजकीय व प्रशासकीय स्तरावर संभ्रम निर्माण झाला होता. तो संभ्रम अखेर दूर झाला असून आज उपाध्यक्ष पदासाठी २१ जून रोजी निवडणूक होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. राज्यपालांच्या संमतीने प्रधान सचिव ह.बा.पटेल यांनी काढलेल्या राजपत्रात नगरपालिका अध्यक्ष, महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा आदेश काढत या पदांना मुदतवाढ दिली होती. मात्र, या राजपत्रात उपाध्यक्षपदाचा कुठलाही उल्लेख नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी उलथापालथ होत असून नगरपालिकांमधील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकांमुळे त्यात आणखी भर नको अशा अंतस्थ हेतूने या निवडणुका पुढे ढलकण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या एका चुकीमुळे या राजपत्रात उपाध्यक्ष हा शब्द टाकल्या गेला नाही व प्रशासन तांत्रिक अडचणीत सापडले. बुलडाणा येथे १३ जून रोजी नगरपालिकेच्या सर्व मुख्याधिकार्‍यांना उपाध्यक्ष निवडणुकीसंदर्भात सूचना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते. मात्र, न.प. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत शासनाकडून कुठल्याही सूचना न आल्याने हे मुख्याधिकारी परतले. येत्या २६ जून रोजी उपाध्यक्षपदाची मुदत संपत असून त्यापुर्वी निवडणुका होणे आवश्यक होते त्यामुळे प्रशासनाने पुर्वतयारी केली होती. ती अखेर प्रत्यक्षात आली असून आता २१ जून रोजी ही निवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी या निवडणुका होऊ घातल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किरण कुरुंदकर यांनी आज निवडणूक कार्यक्रम घोषित करुन संबंधितांना सूचना दिल्या आहेत.