शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ELECTION RESULT-शिवरायांच्या आशीर्वादाचा मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांना विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 18:18 IST

विजयानंतर भाजपाला शिवाजी महाराजांचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांआधी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपानं शिवाजी महाराजांचं नाव घेत जाहिरातबाजी करत जनतेला विजय मिळवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र विजयानंतर भाजपाला शिवाजी महाराजांचा विसर पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. महापालिकांसह जिल्हा परिषदांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपा नेत्यांच्या डोक्यात हवा गेल्याचं दिसत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवेंना शिवरायांचा विसर पडला आहे. निवडणुकांआधी शिवरायांचा जप करणा-या नेत्यांनी विजयानंतर शिवरायांबद्दल अवाक्षरही काढलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकदा, दोनदा नव्हे, तर चारदा नरेंद्र मोदींच्या पारदर्शी कारभारावर जनतेनं विश्वास दाखवत विजय मिळाल्याचं म्हणाले आहेत. मात्र त्यांनी एकदाही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही. तसेच भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनाही विजयाची नशा चढली असून, त्यांनीही शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना एकदाही शिवरायांची आठवण झाली नाही. (BMC ELECTION RESULTS : मुंबईत सेनेची वाढ फुटपट्टीत, तर भाजपाची पटींनी- आशिष शेलार)(BMC ELECTION RESULTS : राज-उद्धव एकत्र येणार नाहीत - मनोहर जोशी)तत्पूर्वी समुद्रातील शिवस्मारकाच्या उद्घाटनावेळी शिवस्मारक व्हावे, हीच बाळासाहेबांची इच्छा असा संदेश असणारे पोस्टर जागोजागी लावण्यात आले होतं. त्यावेळी शिवसेनेनं भाजपावर टीका केली होती. भाजपा या स्मारकाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी धडपडत आहे. शिवराय हे आमचे दैवत आहेत आणि त्यांना आमच्यापासून कोणीही दूर नेऊ शकत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका केली होती.