शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदासाठी निवडणूक शुक्रवारी

By admin | Updated: April 4, 2017 01:16 IST

महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी येत्या शुक्रवारी (दि. ७) मतदान होत आहे.

पुणे : महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी येत्या शुक्रवारी (दि. ७) मतदान होत आहे. यासाठी सोमवारी भाजपा व राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस एकत्र आले असून, सर्व जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. परंतु, भाजपाकडे बहुमत असल्याने याच पक्षाचे सर्व समित्यांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे.महापौर, उपामहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तरी भाजपासाठी ही निवडणूक केवळ औपचारिकता असेल.विधी समितीसाठी भाजपाकडून अध्यक्षपदासाठी अ‍ॅड. गायत्री खडके, तर उपाध्यक्षपदासाठी जयंत भावे यांनी आणि राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी भैयासाहेब जाधव व उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. हाजी गफूर पठाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. क्रीडा समितीसाठी भाजपाकडून अध्यक्षपदासाठी सम्राट थोरात व उपाध्यक्षपदासाठी श्वेता खोसे-गलांडे यांनी, तर राष्ट्रवादीकडून रफीक धनकवडे आणि किशोर धनकवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)शहर सुधारणा समितीसाठी भाजपाकडून अध्यक्षपदासाठी महेश लडकत यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी किरण दगडे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँगे्रसकडून सुमन पठारे आणि प्रदीप गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. महिला व बाल कल्याण समितीसाठी अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या राणी भोसले आणि उपाध्यक्षपदासाठी ज्योती गोसावी यांचे अर्ज असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सायली वांजळे आणि उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मी आंदेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.