शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक संग्राम 21 फेब्रुवारीला

By admin | Updated: January 11, 2017 19:00 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबईसह 10 महापालिकांच्या आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 11 - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबईसह 10 महापालिकांच्या आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यातील 10 महापालिकेच्या निवडणुकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार असून, 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे मतदान दोन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान 16 फेब्रुवारीला, तर दुस-या टप्प्याचं मतदान 21 फेब्रुवारीला होणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात 10 जिल्हा परिषद आणि 118 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. या सर्व निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, परभणी, वर्धा, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. तर दुस-या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली असून, महापालिका निवडणुकांसाठी 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 5.30 वाजल्यानंतर प्रचार करता येणार नाही. तसेच न्यायालयाच्या स्थगितीमुळे नागपूर महापालिकेचा निवडणूक कार्यक्रमात समावेश करण्यात आला नाही.

(राजकीय पक्षांच्या खर्चावर निवडणूक आयोगाचा असणार 'वॉच')10 महापालिका1) मुंबई, 2) पुणे, 3) पिंपरी चिंचवड, 4) ठाणे, 5) उल्हासनगर, 6) नाशिक, 7) नागपूर, 8) अकोला, 9) अमरावती, 10)सोलापूर25 जिल्हा परिषदा1) रायगड, 2) रत्नागिरी, 3) सिंधुदुर्ग, 4) पुणे, 5) सातारा, 6) सांगली, 7) सोलापूर, 8) कोल्हापूर, 9) नाशिक, 10) जळगाव, 11) अहमदनगर, 12) अमरावती, 13) बुलढाणा, 14) यवतमाळ, 15) औरंगाबाद, 16) जालना, 17) परभणी, 18) हिंगोली, 19) बीड, 20) नांदेड, 21) उस्मानाबाद, 22) लातूर, 23) वर्धा, 24) चंद्रपूर, 25) गडचिरोली

असा असणार निवडणुकांचा कार्यक्रम11 जानेवारी 2017 पासून आदर्श आचारसंहिता लागू27 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक अर्ज भरता येणार4 फेब्रुवारीला निवडणूक अर्जाची छाननी होऊन अर्ज मागे घेता येणार5 फेब्रुवारीला निवडणूक चिन्हाचं वाटप होणार6 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येणार21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार23 फेब्रुवारीला मतमोजणी होणारसर्व प्रक्रिया आणि अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार