शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

महापौर पदाची निवडणूक २१ जून रोजी

By admin | Updated: June 6, 2016 23:51 IST

अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाची निवडणूक २१ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी तसे आदेश सोमवारी सायंकाळी काढले

अहमदनगर: अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर- उपमहापौर पदाची निवडणूक २१ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी तसे आदेश सोमवारी सायंकाळी काढले असून नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. कवडे हे मंगळवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहेत. विद्यमान महापौर अभिषेक कळमकर यांची मुदत ३० जूनला संपत आहे. त्या अगोदरच महापौर पदाची निवडणूक घ्यावी लागते. सेनेने सुरेखा संभाजी कदम यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित करून संख्याबळाची जुळवाजुळव केली आहे. सेनेने नगरसेवक सहलीवरही रवाना केले आहेत. सत्ताधारी आघाडीच्या गोटात अजूनही शांतता आहे. महापौर पदाची निवडणूक सेनेने प्रतिष्ठेची केली असून सत्तापक्षाचे नगरसेवकही सेनेच्या गळाला लागले आहेत. मनसेच्या तीन नगरसेवकांना सोबत घेण्यात सेना यशस्वी झाले आहे. सेनेने महापौर पदाचा उमेदवार घोषित केला असला तरी उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. सावेडीतील मनिषा बारस्कर-काळे, उषा नलावडे, बाबासाहेब वाकळे, तसेच मालन ढोणे यांनी उपमहापौर पदावर दावा केला आहे. खासदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र यांच्यासाठी गांधी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महापौर महिला होणार असल्याने उपमहापौरही महिलाच असावी असा हट्ट भाजपच्या उपमहापौर पदाच्या दावेदारांनी धरला आहे. आघाडीत मात्र महापौर व उपमहापौर दोन्ही पदासाठी उमेदवारच निश्चित झालेला नाही. संख्याबळ जुळत नसल्याने उमेदवार निश्चित होत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. (प्रतिनिधी)पक्षनिहाय बलाबलशहर विकास आघाडी २१(राष्ट्रवादी)शिवसेना १९कॉँग्रेस ११भाजप ०९मनसे ०४अपक्ष ०४सेना-भाजपचे संख्याबळ २८ आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी सेनेला ७ नगरसेवकांची कमी होती. मनसेचे तीन, कॉँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी आघाडीचे तीन तसेच दोन अपक्षांना सोबत घेत त्यांना सहलीवर रवाना केले आहे. त्यामुळे आवश्यक संख्याबळापेक्षा अधिक नगरसेवक सेनेने सहलीवर रवाना केले आहेत.