शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाचे अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 05:42 IST

राजकीय पक्षांनाही फायदा : गैरप्रकारांना आळा घालण्यास मदत; नाव बदलणे, पत्त्यात बदल करणे होणार सोपे

- चेतन ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदार यादीत नाव शोधण्यासाठी आणि राजकीय पक्षांना विविध परवानग्या घेण्यासाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या अ‍ॅपची घोषणा केली आहे. या अंतर्गत सामान्य मतदारांसह दिव्यांग मतदारांसाठीही विशेष अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

सर्वसामान्य मतदारांना मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, नावनोंदणीचा अर्ज आदी सुविधा देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाला आदेश दिले आहेत. आदेशानुसार मतदारांसाठी १९५० ही हेल्पलाइनही कार्यरत असेल. यासोबतच एनव्हीएसपी पोर्टलच्या मदतीने मतदारांना नाव वगळणे, पत्त्यात बदल आदी कामे सहज करता येतील.

‘द व्होटर हेल्पलाइन’ या मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने नागरिकांना मतदार यादीतील नावे शोधता येतील. सोबतच आॅनलाइन नावनोंदणीचा अर्ज करतानाच अर्जाची सद्य:स्थितीही पाहता येईल. या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रत्येक प्रकारचा अर्ज, उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र, प्रेसनोट आदी महत्त्वाच्या सूचना मिळतील.दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी अ‍ॅपदिव्यांग मतदारांना नावनोंदणीसह पत्ता बदल अशा सर्व सुविधा पीडब्ल्यूडी या अ‍ॅपमध्ये मिळतील. महत्त्वाचे म्हणजे दिव्यांग मतदारांनी मोबाइल क्रमांकाची नोंद केल्यास निवडणुकीवेळी मतदान केंद्र अधिकारी संबंधित दिव्यांग मतदाराला सर्व आवश्यक सुविधा पुरवतील. सध्या या अ‍ॅपचे काम अंतिम टप्प्यात असून निवडणुकीच्या घोषणेपूर्वी ते सेवेत येईल. या अ‍ॅपचा फायदा राज्यातील सव्वादोन लाख दिव्यांग मतदारांना होईल.