शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अनेक कलाविष्कारांनी रंगली पूर्वसंध्या!

By admin | Updated: February 20, 2016 01:27 IST

नटवर्य मामा पेंडसे यांच्या नाटकातील प्रवेश, लावणी, विनोदी स्कीट, कोळीगीते अशा विविध कलाविष्कारांनी नाट्यसंमेलनाची पूर्वसंध्या रंग

नटवर्य मामा पेंडसे यांच्या नाटकातील प्रवेश, लावणी, विनोदी स्कीट, कोळीगीते अशा विविध कलाविष्कारांनी नाट्यसंमेलनाची पूर्वसंध्या रंगली. निमित्त होते, ते दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ठाणे तिथे काही नाही उणे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.दादोजी कोंडदेव स्टेडियमवर गुरुवारी सायंकाळी उभारलेल्या नटवर्य मामा पेंडसे रंगमंचावर हा कार्यक्रम पार पडला. नटेश्वराची वंदना सादर करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर, नटवर्य मामा पेंडसे यांच्या ‘दुरितांचे तिमीर जावो’ या नाटकातील प्रवेश जयंत सावरकर, शहाजी काळे, प्रतिभा कुलकर्णी, अमोल पंडित या कलाकारांनी सादर केला. सचिन मोहिते याने ‘हा छंद जीवाला’ त्यानंतर मोहिते आणि प्रशांत काळुंद्रे यांनी सादर केलेल्या ‘ले लो भाई चिवडा ले लो’ या गीताला रसिकांची भरभरून दाद मिळाली. काळुंद्रेकर यांनी सादर केलेल्या ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’ या गीतामध्ये रसिक मंत्रमुग्ध झाले होते. ‘वासाचा पयला पाऊस आयला’ हे गीत मोहिते याने आपल्या खास शैलीत सादर केले. ‘माघाची थंडी’ ही लावणी व त्यानंतर पं. सुरेश बापट यांनी नाट्यपद सादर केले. श्याम फडके यांना समर्पित म्हणून एक विनोदी स्कीट विकास समुद्रे व सीया पाटील यांनी सादर केले. शाहीर दामोदर विटावकर यांना आदरांजली म्हणून सादर करण्यात आलेल्या कोळीगीते व कोळीनृत्याने कार्यक्रमाची सांगता झाली. अंजली आमणेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जयंत सावरकर व भावना लेले यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी महापौर संजय मोरे, संमेलनाचे आयोजक खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक उपस्थित होते.