शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

वृद्ध वडीलांना वा-यावर सोडणा-यावर गुन्हा दाखल

By admin | Updated: September 12, 2016 14:58 IST

वृद्ध वडिलांना वा-यावर सोडू पाहणा-या मुलावर नागपूरमधील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १२ -  वृद्ध वडिलांना वा-यावर सोडू पाहणा-या मुलावर प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नितीन बद्रीप्रसाद शहा (वय ४८) असे आरोपी मुलाचे नाव आहे. 
बद्रीप्रसाद गंगाभूषण शहा (वय ७८) हे आयुध निर्माणीतील निवृत्त अधिकारी आहे. त्यांना २० हजार रुपये निवृत्तीवेतन मिळते. त्यांना चार मुले असून, त्यातील एक विदेशात उच्चपदावर कार्यरत आहे. ईतर तीन मुले नागपुरात राहतात. त्यातील एक मनिषनगरात तर नितीन आणि अन्य एक प्रतापनगरातील गुडधे लेआउटमधील प्रशस्त निवासस्थानी राहतात. नितीन लॅण्डस्केपिंगचे कंत्राटदार आहेत. १५ ते १७ वर्षांपासून वडीलांचा ते सांभाळ करीत आहेत. याच घरात राहणारा त्यांचा दुसरा भाऊ खासगी नोकरी करतो. तर, मनिषनगरातील भाऊ एलआयसीत आहे. सुखवस्तू अशा या कुटुंबातील वडिलांचा सर्वच भावांनी सांभाळ करावा, अशी नितीनची भूमिका आहे. रविवारी वडील आणि भाऊ गणपतीचे जेवण करण्यासाठी बाहेर गेले होते. परत आल्यानंतर त्यांना आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावून दिसले. नितीन यांनी त्यांच्या ताब्यातील रुममध्ये येऊ देण्यास मज्जाव केला. त्यावरून भावाभावांमध्ये वाद झाला. तो प्रतापनगर ठाण्यात पोहचला. वडील राहत असलेली रुम आपल्या नावावर आहे, आपल्याला नुतनीकरण करायचे आहे. आपण १५ वर्षांपासून वडीलांचा सांभाळ करतो, आता ईतर भावांनी त्यांना सांभाळावे, अशी  त्यांनी भूमिका घेतली. मात्र, ईतर भावांनी वडीलांना (ज्येष्ठ नागरिक) वा-यावर सोडल्याचा आरोप करून तशी तक्रार प्रतापनगर ठाण्यात नोंदवली.
 ताठर भूमिका
 ठाणेदार शिवाजी गायकवाड आणि त्यांच्या सहका-यांनी या सुखवस्तू कुटूंबातील वादाचा आपसी समेट घडावा, म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, दोन्हीकडून आपलीच बाजू बरोबर असल्याची भूमिका घेण्यात आल्याने शेवटी पीएसआय निशा बनसोड यांनी नितीन शहा यांच्याविरुद्ध वृद्ध वडीलांना वा-यावर सोडण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला