शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

गटनेतेपदी एकनाथ पवार; महापौरसाठी नामदेव ढाके?

By admin | Updated: March 7, 2017 01:32 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता परिवर्तन करीत भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता परिवर्तन करीत भाजपाने एकहाती सत्ता मिळविली आहे. भोसरी मतदार संघातून सत्तारुढ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ पवार यांची निवड जाहीर करण्यात आली असून, चिंचवड मतदार संघातून महापौरपदासाठी नामदेव ढाके यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यामुळे इच्छुकांना उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. महापालिकेचे महापौरपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असून, १४ मार्चला या पदासाठी निवडणूक होत आहे. सध्या या पदासाठी चार ते पाच जण स्पर्धेत आहेत. नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, केशव घोळवे, नितीन काळजे, आशा शेंडगे यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेते ही महत्त्वाची पदे देताना विधानसभा मतदारसंघनिहाय संधी देण्याचे सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गटनेते पद भोसरी विधानसभा मतदारसंघात गेल्याने आता उर्वरित पदे कोणत्या भागाला मिळतात, याबाबत उत्सुकता आहे. पालिकेतील महत्त्वाची पदे मिळविण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. (प्रतिनिधी)माजी शहराध्यक्षाला संधीभाजपाने एकनाथ पवार यांना संधी दिल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघाला सत्तारूढ पक्षनेतेपद मिळाले आहे. एकनाथ पवार हे प्रभाग क्रमांक ११, कृष्णानगर-कोयनानगर-अजंठानगरमधून निवडून आले आहेत. २००७ मध्ये ते भाजपाचे स्वीकृत नगरसेवक होते. पवार यांनी भाजपाचे शहराध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. एकनाथ पवार यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.जुन्या कार्यकर्त्याला न्यायराष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाचा जुना कार्यकर्ता अशी नामदेव ढाके यांची ओळख आहे. औद्योगिकनगरीत कामगार आघाडीत काम करताना प्रदेश पातळीवरही कामाची संधी मिळाली. जुन्या, नव्या कार्यकर्त्यांना मेळ साधला.