शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसेंनी रोखले

By admin | Updated: October 23, 2014 02:44 IST

मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगचा प्रयत्न करणाऱ्या खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसे यांनी बुधवारी रोखल्याची माहिती हाती आली आहे.

जळगाव : मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंगचा प्रयत्न करणाऱ्या खान्देशातील आमदारांना एकनाथ खडसे यांनी बुधवारी रोखल्याची माहिती हाती आली आहे. भाजपा कार्यकारिणीचा निर्णय मान्य राहील, असेही त्यांनी सांगितले.खान्देशातील काही आमदारांसह एकूण ३५ आमदारांनी मुंबईतच खडसे यांची भेट घेतली. त्यात बहुजन चेहऱ्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पक्षाने सातत्याने बहुजन चेहरा दिल्यामुळे राज्यात भाजपाचा विस्तार झाला. गोपीनाथ मुंडेनंतर आता बहुजन चेहरा पुढे केला जावा, असे मुद्दे बैठकीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली. खान्देशातील आमदारांनी खडसेंना मुख्यमंत्री करावे यासाठी पक्ष नेतृत्वाकडे मागणी करण्याचा प्रस्ताव आणला, पण त्याला खडसे यांनीच नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोकण, मुंबई, मराठवाडा व इतर विभागांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. खान्देशच वंचित राहिला आहे. आता खान्देशला संधी मिळावी, अशी अपेक्षा आमदारांनी खडसेंकडे व्यक्त केली. खान्देशातील आमदार खडसेंसोबत मुंबईत होते. जे आमदार मुंबईत भेटू शकले नव्हते ते बुधवारी त्यांना जळगावातील मुक्ताई निवासस्थानी येऊन भेटले. उदेसिंग पाडवी (शहादा), हरिभाऊ जावळे (रावेर), सुरेश भोळे (जळगाव), उन्मेश पाटील (चाळीसगाव) यांचा त्यात समावेश होता. संजय सावकारे (भुसावळ), गिरीश महाजन (जामनेर) यांनी मंगळवारी रात्रीच खडसे यांची भेट घेतली. धुळ््याचे आमदार अनिल गोटे यांनी खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मात्र खडसे यांनी या सर्वांना पक्षाचा निर्णय अंतिम राहील, लॉबिंग करण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)