शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ खडसेंची हकालपट्टी करा!

By admin | Updated: June 2, 2016 03:22 IST

आपण भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असल्याच्या दाव्याचा छेद देण्यासाठी काँग्रेसने आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा

शीलेश शर्मा,  नवी दिल्लीआपण भ्रष्टाचारमुक्त सरकार देत असल्याच्या दाव्याचा छेद देण्यासाठी काँग्रेसने आता महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले असून, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा आणि त्यांनी तो न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मंगळवारी दिल्लीत केली. एकीकडे नरेंद्र मोदी यांनी न खाऊंगा, न खाने दंूगा, असे जाहीर केले होते, पण त्यांच्या या दाव्यातील पोकळपणा उघड झाला आहे, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या सुश्मिता देव यांनी केली. खडसे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे जनतेसमोर आले असूनही पंतप्रधान त्याबद्दल गप्प का आहेत, त्यांना खडसे यांचा भ्रष्टाचार दिसत कसा नाही, असा सवालही त्यांनी केला. खडसे यांच्या मोबाइलवर अंडरवलर्ड डॉनच्या घरून फोन येतो आणि तरीही पंतप्रधानांना त्याचे काही वाटत नाही, अशी टीका करून सुश्मिता देव म्हणाल्या की, ‘खडसे यांच्या साऱ्या कहाण्याच भ्रष्टाचाराच्या असल्याचे आता पुढे येत आहे. विरोधी पक्षांनी न केलेला भ्रष्टाचारही पंतप्रधानांना दिसतो, पण खडसे यांचे नाव पुढे येताच मात्र ते आता भाजपाचे सारे नेते गप्प बसतात, हे आश्चर्यच आहे.’ज्या मोबाइलवर दाऊदच्या घरून फोन आले, तो क्रमांक आपला असल्याचे स्वत: एकनाथ खडसे यांनी मान्य केले आहे, याकडे लक्ष वेधून त्या म्हणाल्या की, ‘जोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून दूर केले जात नाही, तोवर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे अशक्य आहे. त्यामुळे खडसे यांचा राजीनामा घेण्यात यावा, अन्यथा त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.’ >भाजपाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना पंतप्रधान त्याकडे डोळेझाक करीत आहे, असा आरोप करून सुश्मिता देव या म्हणाल्या की, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंंधराराजे या ललित मोदी यांना पाठिशी घालतात आणि तरीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, याची कारणे जनतेला माहीत आहे.एवढेच नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह सरकारचा यांचा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील घोटाळा, त्यांच्या मुलाचे परदेशातील काळ्या पैशाचे प्रकरण, अनेक बळी घेणारा मध्य प्रदेशातील शिवराजसिंग चौहान सरकारचा व्यापम घोटाळा अशी प्रकरणे समोर आली असतानाही त्याची चौकशी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी तयार नाहीत. याचाच अर्थ, ते भ्रष्टाचार आणि घोटाळेबाज यांना पाठिशी घालत आहेत.