शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वन कॉईन प्रकरणात अठरा जणांना अटक

By admin | Updated: April 25, 2017 02:07 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर आॅनलाइन गुंतवणूक करणाऱ्या वन कॉईन कंपनीच्या अठरा एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर आॅनलाइन गुंतवणूक करणाऱ्या वन कॉईन कंपनीच्या अठरा एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. जुईनगर येथील सेमिनारमध्ये उपस्थित नागरिकांना त्यांच्याकडून झटपट श्रीमंतीचे आमिष दाखवले जात असताना पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी ताब्यात घेतलेल्यांकडे केलेल्या चौकशीत सदर कंपनीकडे भारतात आर्थिक व्यवहार करण्याची कसलीही परवानगी नसल्याचे समोर आले आहे.विदेशात स्थापन झालेल्या वन कॉईन या आॅनलाइन एमएलएम कंपनीचे सेमिनार शहरात होत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. यानुसार पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत यांनी विविध पथके तयार करून जुईनगरमधील बन्ट हॉलमध्ये सेमिनार सुरू असताना छापा टाकला. या कारवाईत अठरा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या इतरही साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. अटक केलेल्यांच्या विरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात प्राईझ चीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्किम (बॅनिंग) अ‍ॅक्ट १९७८ च्या कलम ३ व ४ नुसार तसेच इतर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये बाबासाहेब पाटील (३७), शिवनारायण केवट (३४), निमेश माणिक (३४), रवींद्र गोखले (४९), यशवंत चौगुले (५२), अतुल दिघे (५४), सुरेश लहाणे (५२), रमेश गुप्ता (३९), सुनील यादव (२८), छगन कुमावत (२४), मोहमद हुसेन गफुर खान (२०), प्रवेश गुप्ता (३६), दुधनाथ बरसाती (५०), मनोज मोदी (३३), प्रीतम पाटील (३४), सुलतान खान (५३), भूपेंद्रसिंग कांत (५६) व जगदीश पुरी (३६) यांचा समावेश आहे. वन कॉईनमध्ये गुंतवणूकदारांना प्रवृत्त करण्यासाठी ठिकठिकाणी सेमिनार घेतले जात आहेत. या कंपनीचे मुख्यालय बल्गेरीया देशात असून त्यांचे जाळे अनेक देशांमध्ये पसरले आहे. मात्र त्यांच्याकडून फसवणुकीची अधिक शक्यता असल्यामुळे काही देशांनी यावर बंदी घातलेली आहे. कंपनीच्या एजंटकडून प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर सेमिनार घेतले जात आहेत. त्या माध्यमातून नागरिकांना मोठा नफा असल्याचे आमिष दाखवले जात आहे. परंतु प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या क्रिप्टो चलनावर आधारित गुंतवणूक करून घेणाऱ्या या एमएलएम कंपनीकडे भारतात आर्थिक व्यवहारासाठी आरबीआयचा अथवा इतर कोणाचाही परवाना नाही. त्यामुळे गुंतवणुकीच्या माध्यमातून संभाव्य कोट्यवधीची फसवणूक टाळण्यासाठी ही कारवाई केल्याचेही आयुक्त नगराळे यांनी सांगितले. तर अद्यापपर्यंत ५२ लाख ३६ हजारांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)