शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत झाले २० वे हृदयप्रत्यारोपण

By admin | Updated: June 21, 2016 19:35 IST

जुलै २०१५ पर्यंत हृदयविकाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपणाचा पर्याय दिला असता तर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नसता.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 21 - जुलै २०१५ पर्यंत हृदयविकाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपणाचा पर्याय दिला असता तर त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नसता. कारण, तब्बल ४२ वर्षे उलटूनही राज्यात एकही हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली नव्हती. पण, आॅगस्ट २०१५ मध्ये मुंबईतले पहिले हृदय प्रत्यारोपण यशस्वी झाले. आणि अवघ्या ११ महिन्यांत हृदय प्रत्यारोपणामुळे २० जणांना जीवनदान मिळाले आहे. मंगळवार, २१ जून रोजी हृदय घेऊन औरंगाबाद ते मुंबई हे २९९ किमीचे अंतर अवघ्या १ तास २० मिनिटांत कापले. ३८ वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. औरंगाबाद येथील ३२ वर्षीय पुरुषाच्या कुटुंबियाने हृदयदान केल्यामुळे ३८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वायरल मायोकार्डिटीस आणि इंट्राक्टटेबल आर्थे्रमिया या आजाराने ग्रस्त होता. कोणत्याही प्रकारची औषधांचा आणि उपचारांचा त्याच्यावर परिणाम होत नव्हता. हृदय प्रत्यारोपण हा शेवटचा पर्याय होता. औरंगाबादमधील पुरुषाने हृदयदान केल्यामुळे ३८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले आहे. ज्या कुटुंबियांनी हृदयदान करण्यात पुढाकार घेतला हे सर्व श्रेय त्यांचे आहे. कारण, त्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीचे मेंदू मृत झाल्यावर हृदयदान केल्यामुळे आम्ही यशस्वीपणे २० जणांना हृदयप्रत्यारोपण करुन जीवनदान देऊ शकलो आहोत. प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. पुढचे ४८ ते ७२ तास त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्याला वॉर्डमध्ये हलवण्यात येईल, असे हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे यांनी सांगितले. --------------------------------असा झाला हृदयाचा प्रवास सकाळी ६.३५ - औरंगाबादच्या युनायटेड सिग्मा रुग्णालयातून हृदय घेऊन डॉक्टर निघालेसकाळी ६.४२ - हृदय औरंगाबाद विमानतळावर पोहचले. सकाळी ६.५२ - कमर्शिअल फ्लाईटने हृदय घेऊन डॉक्टर मुंबईच्या दिशेने निघालेसकाळी ७.२७ - हृदय घेऊन डॉक्टर मुंबई विमानतळावर पोहचले सकाळी ७.३५ - हृदय घेऊन रुग्णवाहिका फोर्टिस रुग्णालयाच्या दिशेने निघालीसकाळी ७.५४ - हृदय फोर्टिस रुग्णालयात पोहचले सकाळी ७.५५ - हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. ------------------------------रस्त्यावर असा केला होता ग्रीन कोरिडोर -मुंबईत एअरपोर्टच्या गेट क्रमांक आठपासून ते फोर्टिस रुग्णालयात या मार्गावर ग्रीन कोरिडोअर करण्यात आला होता. -सांताक्रूझ विमान तळ गेट क्रमांक ८ -मिलिटरी रोड- सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड-छेडा नगर ते इस्टर्न एक्सप्रेस हायवे-ऐरोली जंक्शन-फोर्टिस रुग्णालय, मुलुंड