शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

आठ वर्षे गर्भपाताचा धंदा

By admin | Updated: March 7, 2017 04:31 IST

म्हैसाळ (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा धंदा सुरू होता

सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथे डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या भारती हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा धंदा सुरू होता, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. पोलिस व वैद्यकीय समितीच्या संयुक्त पथकाने सोमवारी खिद्रापुरेच्या रुग्णालयावर छापा टाकून, गर्भपात तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स व आणखी कागदपत्रे जप्त केली. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हा आरोग्य विभागाने चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे. डॉ. खिद्रापुरे अद्याप फरारी असून त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपाता दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केल्यानेच खिद्रापुरेचे कारनामे चव्हाट्यावर आले. त्याने गर्भपात केलेले भ्रूण म्हैसाळमध्ये ओढ्यालगत पुरल्याचे स्पष्ट झाले. रविवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने त्या ठिकाणी खुदाई केली, त्यावेळी १९ भ्रूण सापडले होते. सोमवारी दुपारी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय समिती यांच्या संयुक्त पथकाने रुग्णालयावर छापा टाकला व तेथील कागदपत्रे व औषधांची तपासणी करण्यात आली. यामध्ये खिद्रापुरे २००९ पासून गर्भपाताचा धंदा करीत होता, असे पुरावे मिळाले आहेत. (प्रतिनिधी)>रात्रीस खेळ चाले...डॉ. खिद्रापुरे याच्या दवाखान्यात सुसज्य शस्त्रक्रियागृह सापडले असून रात्रीच्या वेळी तेथे गर्भपाताचा धंदा चालायचा. दिवसा तातडीच्या गर्भपातासाठी तळघरात आणखी एक शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले होते. तळघरात शस्त्रक्रियागृहात एक हौद आहे. या हौदात अ‍ॅसिड टाकून भ्रूण नष्ट करण्यात येत असल्याचा संशय आहे. दवाखान्यात गर्भपाताची उपकरणे व औषधे मोठ्या प्रमाणावर सापडली आहेत. गर्भपातासाठी २५ ते ३० हजार रूपये दर होता.