शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काकाच्या मृत्युस कारणीभूत पुतण्याला आठ वर्षे सक्तमजुरी

By admin | Updated: February 27, 2017 20:29 IST

कळवण तालुक्यातील घटना : मिरचीच्या रोपावरून काका-काकूला मारहाण ; काकाचा मृत्यू

काकाच्या मृत्युस कारणीभूत पुतण्याला आठ वर्षे सक्तमजुरीकळवण तालुक्यातील घटना : मिरचीच्या रोपावरून काका-काकूला मारहाण ; काकाचा मृत्यूनाशिक : शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून काका - काकूला पुतण्याने मोगरीने केलेल्या मारहाणीत काकाचा मृत्यु झाल्याची घटना कळवण तालुक्यातील माळगाव येथे २०१५ ला घडली होती़ जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात न्यायाधीश एनक़े़ब्रह्मे यांनी आरोपी राजेंद्र भाऊराव गायकवाड (२६, रा़माळगाव, ताक़ळवण, जि़नाशिक) या पुतण्यास मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी ठरवत सोमवारी (दि़२७) आठ वर्षे सक्तमजुरी व चौदा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़कळवण तालुक्यातील माळगाव येथील आरोपी राजेंद्र गायकवाड याचे ८ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आपले काका गुलाब गायकवाड व काकू रजुबाई गायकवाड यांच्यासोबत शेतात मिरचीचे रोप लावण्याच्या कारणावरून भांडण झाले़ यामध्ये आरोपी राजेंद्र याने काका व काकूलला मोगरीने मारहाण केली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गुलाब गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला़ या प्रकरणी रजुबाई गायकवाड यांनी पुतण्या राजेंद्र गायकवाडविराधोत कळवण तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी १२ साक्षीदार तपासले़ या साक्षीदारांमध्ये मयत गुलाब गायकवाड यांची पत्नी रजुबाई व व एका नऊ वर्षांच्या मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायालयाने फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद तसेच समोर आलेल्या साक्षी पुराव्यानुसार आरोपी राजेंद्र गायकवाड यास मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम ३०४(२) अन्वये आठ वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड तर भारतीय दंड विधान कलम ३२४ (धातक हत्याराने इच्छापुर्वक दुखापत करणे) अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेत आरोपी राजेंद्र गायकवाड याने काँक्रिट शिक्षा भोगावयाच्या असून दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये फिर्यादी रजुबाई गायकवाड यांना देण्यात यावे असे म्हटले आहे़ या खटल्यातील आरोपी राजेंद्र गायकवाड हा घटना घडल्यापासून कारागृहात आहे़(प्रतिनिधी)