खामगाव (जि. बुलडाणा): उष्माघाताने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना खामगाव येथे घडली. खामगाव शहरातील गांधी ले-आऊट मधील रहिवासी रविंद्र वानखेडे यांचा ८ वर्षीय मुलगा प्रज्वल याला २३ मे रोजी प्रकृती बिघडल्याने खासगी दवाखान्या दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याची माहीती आहे.
उष्माघाताने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू
By admin | Updated: May 25, 2016 02:07 IST