शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये ऑइल मीलची टाकी साफ करताना आठ कामगार बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 21:56 IST

कीर्ती आॅईलमिलमध्ये संध्याकाळच्या वेळी केमिकल टँकची स्वच्छता करण्यासाठी उतरलेले ७ ते ८ कामगार चार-पाच तासांपासून बाहेर न आल्यामुळे खळबळ

 ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 30 -  येथील १२ नंबर पाटीजवळ असलेल्या कीर्ती आॅईलमिलमध्ये  संध्याकाळच्या वेळी केमिकल टँकची स्वच्छता करण्यासाठी उतरलेले ७ ते ८ कामगार चार-पाच तासांपासून बाहेर न आल्यामुळे खळबळ उडाली आहे.  हे सर्व कामगार मयत झाले असल्याच्या संशयाने लातूरच्या औद्योगिक वर्तुळात धक्का बसला आहे. रात्री उशिरापर्यंत केमिकल टँकमध्ये अडकलेल्या कामगारांना कसे काढायचे, याचे शर्थीने प्रयत्न चालू होते. त्यामुळे नेमके किती कामगार अडकले व किती जणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

लातुरातील प्रसिद्ध कीर्ती आॅईल मिलचे १२ नंबर पाटी येथे युनिट आहे. या मिलमधील एका केमिकल टँकची दर दहा-पंधरा दिवसाला स्वच्छता होते. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास या टँकच्या स्वच्छतेसाठी काही कामगार हे टाकीत उतरले. मात्र ते परत आले नाहीत. त्यामुळे अन्य कामगार टाकीत उतरलेले कामगार का परत आले नाहीत, या चौकशीला गेले. मात्र तेही परत आले नाहीत. असे सात ते आठ कामगार या टाकीत उतरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यातील एकही कामगार बाहेर न आल्यामुळे या सर्वांचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिकृत माहिती कोणतीच बाहेर आली नाही. मिलचे संचालक कीर्ती भुतडा यांच्याशी संपर्कही होऊ शकला नाही. त्यामुळे नेमक्या कामगारांचा मृत्यू झाला, हेही कळू शकले नाही. परंतु, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ते ८ जण या टाकीत बेपत्ता झाल्याचे बोलले जाते.  
केमिकल टँकमध्ये नेमके काय झाले..?
आॅईल मिलमधील या केमिकल टँकमध्ये मोठ्या प्रमाणात अशुद्ध रासायनिक द्रव्य व पाणी जमा होते. हा टँक स्वच्छ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले केमिकल टाकून ठेवले जाते. ठराविक दिवसात हे केमिकल टाकीतील इतर रासायनिक द्रव्याला स्वच्छ करून संपूर्ण टँक धुवून काढला जातो. यासाठी काही कंत्राटी कामगार नियुक्त केलेले आहेत. हे कामगार नियमितपणे सोमवारी स्वच्छतेसाठी उतरले होते. परंतु, ते बाहेरच आले नाहीत. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण केमिकलमध्ये दडले आहे की केमिकलपासून तयार झालेल्या विषारी वायूमुळे? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.