शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जुगार खेळताना माजी आमदारासह आठ व्यापा-यांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 28, 2016 09:12 IST

सोलापुरातील एका नामवंत थ्री स्टार हॉटेलमध्ये माजी आमदारासह शहरातील नामवंत व्यापारी अंदर बाहर नामक जुगार खेळताना पकडले.

ऑनलाइन लोकमत 

सोलापूर, दि. २८ -  सोलापुरातील एका नामवंत थ्री स्टार हॉटेलमध्ये माजी आमदारासह शहरातील नामवंत व्यापारी अंदर बाहर नामक जुगार खेळताना पकडले. सदर बझार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी मध्यरात्री ही  कारवाई करण्यात आली पहाटे  पाचच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला. 
 
शहरातील गांधीनगर परिसरातील नामवंत थ्री स्टार हॉटेलमधील रुम नं. ३१० मध्ये अंदर बाहर नावाचा जुगार बेकायदेशीरपणे खेळला जात असल्याची खबर सदर बझार पोलिसांना मिळाली. यावरुन त्यांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता शहरातील नामवंत मंडळी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यामध्ये माजी आमदार रतिकांत शंकरप्पा पाटील (वय ४७, रेल्वे लाईन, सोलापूर), प्रकाश तेजराज जैन (वय ६१, रा. कुमठा नाका, सोलापूर), शिवशरण रेवणसिद्धप्पा तंबाके (वय ५०, रा. बाळीवेस), सूर्यकांत शंकरप्पा पाटील (वय ५८, शुक्रवार पेठ, सोलापूर), केतन मनसुखलाल व्होरा (वय  ५८, रेल्वे लाईन्स, सोलापूर), श्रीकांत महादेव जोशी (वय ६१, रा. निरापाम सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर), दीपचंद जगदीश राठी (वय ४८, बुधवार पेठ, पंधे कॉलनी, सोलापूर) यांचा समावेश आहे. 
 
या प्रकरणी पो.कॉ. घोडके यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सदर आरोपींना नोटीस बजावून सोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अधिक तपास फौजदार कोकणे करीत आहेत.