शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पद्म’साठी आठ प्रस्ताव

By admin | Updated: September 14, 2014 01:12 IST

देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी नागपूर जिल्ह्यातून आठ जणांच्या नावांचा शिफारस प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

दिवंगत श्रीकांत जिचकार, कवी मधुप पांडेय यांचा समावेशचंद्रशेखर बोबडेनागपूर: देशातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक ‘पद्मश्री’ पुरस्कारासाठी नागपूर जिल्ह्यातून आठ जणांच्या नावांचा शिफारस प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात कवी मधुप पांडेय यांच्या नावाचा समावेश आहे. दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाची मरणोत्तर सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे.कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणासह इतरही सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना पद्म पुरस्काराने गौरविले जाते. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा म्हणजे २०१५ च्या पद्म पुरस्कारासाठी जिल्हा पातळीवरून विविध क्षेत्रातील आठ मान्यवरांच्या नावाचे शिफारस प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यात हिंदी साहित्य क्षेत्रातील दिग्गज कवी मधुप पांडे ऊर्फ मधुसुदून अलियास, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. विकी रुधवानी, डॉ. लोकेशचंद्र सिंग, साहित्य व शिक्षण क्षेत्रातून डॉ. भाऊसाहेब चावडे, साहित्यिक क्षेत्रातून सय्यद सालेम, साहित्य व शिक्षण क्षेत्रातून डॉ. सुधाकर मोगलेवार, कला क्षेत्रातून तबला वादक प्रशांत गायकवाड आणि सार्वजनिक कार्य आणि शिक्षण क्षेत्रातून दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाचा समावेश आहे. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाची मरणोत्तर पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.केंद्र सरकारकडून गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्काराची घोषणा केली जाते. मात्र त्याची प्रक्रिया मे महिन्यापासूनच सुरू होते. यंदा त्याला थोडा उशीर झाला आहे. राज्य सरकार जिल्हा पातळीवरून प्रस्ताव मागवते व नंतर ते एकत्रितपणे केंद्र सरकारकडे पाठविते. केंद्र सरकार यावर अंतिम निर्णय घेते. या सर्व मान्यवरांच्या नावांच्या प्रस्तावाला राजकीय नेत्यांच्या शिफारशींचेही पत्र जोडण्यात आले आहे. यापूर्वी नागपूरसह विदर्भातील मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.