शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
3
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
4
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
5
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
6
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
7
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
8
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
9
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
12
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
13
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
14
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
15
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
16
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
17
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
18
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
19
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
20
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?

जुने साहित्य वापरून वाचविले आठ कोटी

By admin | Updated: August 21, 2014 00:33 IST

साहित्य (स्पेअरपार्ट) खराब झालेल्या वाहनांसाठी वापरून संरक्षण विभागची तब्बल आठ कोटी रुपयांच्या खर्चची बचत केली आहे.

पुणो : देहूरोड येथील केंद्रीय शस्त्रस्त्र विभागाने (सीओडी) लष्कराच्या क्षेपणास्त्र वाहक  ट्रकचे शिल्लक  साहित्य (स्पेअरपार्ट)  खराब झालेल्या वाहनांसाठी वापरून संरक्षण विभागची तब्बल आठ कोटी रुपयांच्या खर्चची बचत केली आहे. शस्त्रस्त्र विभागाचे कमांडंट ब्रिगेडियर राजन कोच्चर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
ब्रिगेडियर कोच्चर म्हणाले, की या विभागात अशा अनेक गाडय़ा होत्या, की ज्यांचे उत्पादन बंद झालेले होते. मात्र, या गाडय़ांचे जुने स्पेअर पार्ट येथील 
डेपोमध्ये पडून होते. हे पार्ट वापरात 
नसल्याने आम्हाला नवीन गाडय़ा 
घ्याव्या लागणार होत्या. ही स्थिती 
लक्षात घेऊन आम्ही संरक्षण मंत्रलयाला या पार्टचा वापर करण्यासाठीची संमती मागितली. ती मिळाल्यानंतर जुने पार्ट वापरून बंद असलेली वाहने सुरू केली. त्यामुळे ही नव्या गाडय़ा खरेदी करण्यासाठी लागणार रक्कम वाचली.
दरम्यान, देहूरोडमध्ये सीओडीमधील अशोक लेलँड आणि टँट्रा 813 ट्रक आहेत. देशातील सर्व सीओडीमध्ये अशा सात 
हजार गाडय़ा आहेत. रशियन बनावटीच्या 
टँट्रा वाहनांचा उपयोग ब्रrाोस, पिनाक 
ही क्षेपणास्त्रे वाहतूक करण्यासाठी 
केला जातो. अशोक लेलँडचा वापर सैनिकांची ने-आण आणि मालवाहतुकीसाठी केला जातो. 
यातील टँट्रा 813 ट्रकचे उत्पादन बंद झाल्याने या गाडय़ांचे पार्ट विभागाकडे शिल्लक होते. ही गाडी बंद झाल्यानंतर टँट्रा 818 श्रेणीची वाहने आमच्याकडे उपलब्ध झाली. या गाडय़ासाठी आम्ही 2क्12-13मध्ये  हे शिल्लक पार्ट वापरून संरक्षण विभागचे आठ कोटी रुपये वाचविले असल्याचे कोच्चर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 
प्रशासकीय भवनाच्या नवीन इमारतीसाठी चार कोटी मंजूर 
देहूरोड येथील या विभागाची प्रशासकीय इमारात जुनी झाली असल्याने नवीन प्रशासकीय भवन उभारण्यासाठी दक्षिण कमांड विभागाने 4 कोटी 11 लाख रुपयांच्या निधीला मान्यता दिल्याचे कोच्चर यांनी सांगितले. या निधीतून या इमारतीचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तसेच, लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय, पंचवार्षिक योजनेत देशातील सर्व सीओडीचे अत्याधुनिकीकरण करण्यात येत असून, त्याअंतर्गत सीओडी जबलपूर व आग्रा येथे अत्याधुनिकीकरण 
करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षात मुंबई व देहूरोड येथील सीओडीचाही त्यात समावेश होणार आहे.